मराठी बातम्या /बातम्या /देश /70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेसोबत घेतल्या सप्तपदी; मात्र, का घेतला इतका मोठा निर्णय?

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेसोबत घेतल्या सप्तपदी; मात्र, का घेतला इतका मोठा निर्णय?

सासरा 70 वर्षांचा आणि सून 28 वर्षांची....अजब गजब लग्न...

सासरा 70 वर्षांचा आणि सून 28 वर्षांची....अजब गजब लग्न...

सासरा 70 वर्षांचा आणि सून 28 वर्षांची....अजब गजब लग्न...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

गोरखपूर, 26 जानेवारी : याला प्रेम म्हणायचं की, आणखी काही? समाजाची पर्वा न करता एका वृद्धाने आपल्या सुनेसोबत लग्न केलं. येथे एका 70 वर्षांच्या वृद्ध सासऱ्याने आपल्या 28 वर्षांच्या सुनेसोबत मंदिरात जाऊन लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजूबाजूला अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान News18 लोकमत या बातमीची पुष्टी करीत नाही.

काय आहे प्रकरण?

ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील आहे. येथे एका 70 वर्षीय कैलाश यादव याने 28 वर्षीय सून पूजासोबत मंदिरात जाऊन लग्न केलं. या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान News18 लोकमत या फोटोची पुष्टी करीत नाही. दरम्यान वृद्ध सासऱ्यासोबत लग्न केल्यानंतर सूनेने सासऱ्यासोबत आनंदात संसार थाटला आहे.

मुलाच्या वयाच्या तरुणासोबत अफेयर, समजावूनही महिलेने ऐकले नाही, पतीने तिचा विषयच संपवला!

पत्नी आणि मुलाच्या मृत्यूनंतर...

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास यादव गोरखपूर येथे सुरक्षा रक्षकाचं काम करतो. त्याच्या पत्नीचं 12 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. कैलास यांना चार मुलं आहे. त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाच्या मुलाचं निधन झालं आहे. यानंतर त्याची पत्नी पूजाचं दुसरीकडे लग्न लावून देण्यात आलं. मात्र सुनेला ते घर आवडलं नाही. यानंतर सून ते घर सोडून पुन्हा सासरी आहे.

परवानगीने केलं लग्न, इंटरनेटवर फोटो व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान सासऱ्याचं सुनेवर प्रेम जडलं. यानंतर दोघांनी एकमेकांच्या संमतीने वय आणि समाजाची पर्वा न करता एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सासरा आणि सुनेच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आजूबाजूच्या गावातील लोकही यावर चर्चा करीत आहेत.

First published:

Tags: Marriage