Love Jihad प्रकरणात दुसरी FIR दाखल; नाव आणि धर्म लपवून लग्नाच्या जाळ्यात ओढलं

विवाहासाठी जबरदस्तीने धर्मांतर करणं हा कायदेशीर गुन्हा असल्याचा नवीन कायदा आल्यानंतर बरेलीतच ‘लव्ह जिहाद’चा पहिला एफआयआर (प्राथमिक चौकशी अहवाल) २९ नोव्हेंबरला दाखल करण्यात आला होता, तर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहासाठी जबरदस्तीने धर्मांतर करणं हा कायदेशीर गुन्हा असल्याचा नवीन कायदा आल्यानंतर बरेलीतच ‘लव्ह जिहाद’चा पहिला एफआयआर (प्राथमिक चौकशी अहवाल) २९ नोव्हेंबरला दाखल करण्यात आला होता, तर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:
    बरेली, 30 नोव्हेंबर :  देशभरात आपलं नाव आणि धर्म लपवून परधर्मातील मुलींशी लग्न करण्याच्या व त्यांची फसवणूक करण्याच्या घटना  दिसून येत आहेत. या प्रकरणांना (कथित) लव्ह जिहाद म्हटलं जातं. त्यानंतर देशातील काही राज्यांनी याला पायबंद घालण्यासाठी अशी फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची तरतूद असलेले कायदे केले आहेत. त्यांना उत्तर प्रदेशात जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याच्या विरोधातील अध्यादेश काढण्यात आल्यानंतर आता बरेलीत कथित ‘लव्ह जिहाद’चं दुसरं प्रकरण उघडकीस आलं आहे. बरेली पोलिसांनी इज्जतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे असं वृत्त आज तक या वृत्तवाहिनीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. विवाहासाठी जबरदस्तीने धर्मांतर करणं हा कायदेशीर गुन्हा असल्याचा नवीन कायदा आल्यानंतर बरेलीतच ‘लव्ह जिहाद’चा पहिला एफआयआर (प्राथमिक चौकशी अहवाल) २९ नोव्हेंबरला दाखल करण्यात आला होता, तर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ही वाचा-तरुणाच्या हत्येसाठी ऑर्डर केले 25 चाकू; अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला पोलिसांचं निवेदन या प्रकरणात नाव आणि धर्म लपवून लग्न करण्यात आले आहे. मुलीने तक्रार केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी मूळ खटला नवीन कायदा लागू होण्यापूर्वी दाखल करण्यात आला होता, पण नवीन कायदा आल्यानंतर नवीन कलमे लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी या अध्यादेशाला मंजुरी दिली होती. बरेलीतच रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवसांत लव्ह जिहादचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा बरेलीतील देवरानिया पोलीस ठाण्यात दाखल झाला असून, यातील आरोपी फरार आहे. मुलीला फसवून धर्म परिवर्तन केल्याचा आरोप मुलावर लावण्यात आला आहे. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम राबवत आहेत. उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळानं २४ नोव्हेंबरला लव्ह जिहादच्या विरोधातील अध्यादेशाला मंजुरी दिली होती. त्यानंतर मंजुरीसाठी तो राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठवण्यात आला होता. राज्यपालांनी याला मंजुरी दिल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर झालं असून, अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य सरकारला सहा महिन्यांच्या आत विधानसभेत हा अध्यादेश मंजूर करून घ्यावा लागणार आहे. हे ही वाचा-Shocking! Toilet मध्ये गेलेल्या तरुणीच्या गर्भातून अचानक निघालं बाळाचं डोकं आणि. या अध्यादेशात फसवून, जबरदस्तीने, धमकी देऊन, लालूच दाखवून, भुरळ पाडून, खोट्या आश्वासानांच आमिष दाखवून, विवाहाच्या नावावर करण्यात येणारं सक्तीचं धर्मांतर हा गुन्हा समजला जाणार आहे. या गुन्ह्यासाठी 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. फक्त विवाह करण्यासाठी कोणी मुलीचा धर्म बदलत असेल तर तो विवाह बेकायदेशीर मानला जाईल. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात परिवर्तन केलेले नसेल तर त्याचा पुरावा देण्याची जबाबदारी आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीची आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: