हिमकडा कोसळून 2 जवान शहीद, गेल्या 15 दिवसांतली दुसरी घटना

हिमकडा कोसळून 2 जवान शहीद, गेल्या 15 दिवसांतली दुसरी घटना

दक्षिण सियाचिनमध्ये हिमकडा कोसळून 2 जवान शहीद होण्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना सियाचिनमध्ये 18 हजार फूट उंचीवर घडली.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : दक्षिण सियाचीनमध्ये हिमकडा कोसळून 2 जवान शहीद होण्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना सियाचीनमध्ये 18 हजार फूट उंचीवर घडली. गेल्या 15 दिवसांत हिमकडा कोसळण्याची ही दुसरी दुर्घटना आहे. हिमकडा कोसळण्याच्या घटनेनंतर लगेचच बचाव पथक तिथे आलं आणि त्यांनी गस्ती पथकाच्या जवानांची सुटका केली. हेलिकॉप्टरच्या मदतीने जवानांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं. पण हे पथक दोन जवानांचे प्राण मात्र वाचवू शकलं नाही.

याआधी काय झालं होतं?

सियाचीन ही जगातली सर्वात मोठी युद्धभूमी आहे. काही दिवसांपूर्वीच हिमकडा कोसळून इथे 4 जवानांचा मृत्यू ओढवला होता. तर 2 नागरिकांचाही जीव गेला. ही घटनाही 19 हजार फूट उंचीवर घडली होती.

भारतीय लष्कराने सांगितलं की, 19 नोव्हेंबरला 8 जवानांचं एक गस्ती पथक हिमवादळात फसलं होतं. यातल्या 8 जवानांपैकी 7 जण गंभीर जखमी झाले. या जवानांना हेलिकॉप्टरनेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. पण 6 जवानांचा मृत्यू ओढवला. यामध्ये 4 जवान आणि 2 सैन्यातलेच हमाल होते.

हायपोथर्मियाने मृत्यू

या सगळ्यांचा हायपोथर्मिया मुळे मृत्यू ओढवला. हायपोथर्मिया म्हणजे शरीराची अशी स्थिती असते ज्यात शरीराचं तापमन सामान्य तापमानापेक्षा कमी होतं. हिमस्खलनामुळे या जवानांबाबतही असंच झालं. शरीराचं तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला.

============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या