S M L

जम्मूतल्या सुंजवा लष्करी तळावर ५१ तासांपासून सर्च ऑपरेशन सुरूच

जम्मूतल्या सुंजवा लष्करी तळावर अजुनही सर्च ऑपरेशन सुरूच आहे. गेली ५२ तास दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती यात 5 जवान शहीद झाले तर 4 अतिरेकी ठार झाले.

Sonali Deshpande | Updated On: Feb 12, 2018 12:54 PM IST

जम्मूतल्या सुंजवा लष्करी तळावर ५१ तासांपासून सर्च ऑपरेशन सुरूच

12 फेब्रुवारी : जम्मूतल्या सुंजवा लष्करी तळावर अजूनही सर्च ऑपरेशन सुरूच आहे. गेली ५२ तास दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती यात 5 जवान शहीद झाले तर 4 अतिरेकी ठार झाले. सध्या सुरक्षा दलाचं सर्च ऑपरेशन सुरू असून परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे, तर काही वेळापूर्वीच श्रीनगरमध्ये सीआरपीएफ कॅम्पजवळ एके - 47 बंदुकीसह 2 संशयित दहशतवादी आढळले. जवानांच्या गोळीबारानंतर ते दोन्ही दहशतवादी तिथून फरार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

सुंजवा लष्करी तळावर अतिरेकी असल्याची शंका असलेली एक इमारतही लष्करानं स्फोट करून उडवून दिली. याच परिसरात लष्कराचे कुटुंबीयही राहतात. त्यामुळे कारवाई करताना जवानांना जास्त काळजी घ्यावी लागतेय. हेलिकॉप्टरच्या मदतीनंही या संपूर्ण भागावर लष्कराची निगराणी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 12:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close