Home /News /national /

मोदींच्या जबरा फॅनने बनवला 'मोदी गुल्लक', म्हणाला- मनी बँक देईल पंतप्रधानांसारखं काम करण्याची प्रेरणा

मोदींच्या जबरा फॅनने बनवला 'मोदी गुल्लक', म्हणाला- मनी बँक देईल पंतप्रधानांसारखं काम करण्याची प्रेरणा

बिहारमधील एका मूर्तीकाराने (Bihar Sculptor) पंतप्रधान मोदींचे लहान लहान पुतळे बनवले आहेत. विशेष म्हणजे हे पुतळे केवळ शोभेचे नसून, त्यांचा वापर पैसे साठवण्याच्या गल्ल्याप्रमाणेही (Piggy Bank) करता येणार आहे.

मुझफ्फरपूर, 16 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) देशात अनेक चाहते आहेत. कित्येक लोक मोदींशी संबंधित वस्तू घेणं पसंत करतात. यामध्ये मग मोदी जॅकेट असो, वा ‘नमो नमो’ लिहिलेल्या टोप्या असोत. बिहारमधील एका मूर्तीकाराने (Bihar Sculptor) पंतप्रधान मोदींचे लहान लहान पुतळे बनवले आहेत. विशेष म्हणजे हे पुतळे केवळ शोभेचे नसून, त्यांचा वापर पैसे साठवण्याच्या गल्ल्याप्रमाणेही (Piggy Bank) करता येणार आहे. लहानपणी आपण मुलांना पैसे साठवायला पिगी बँक देतो तशीच ही मनी बँक आहे. ही बँक म्हणजे छोटीशी साधारण एक ते दीड फुटाची मातीची मूर्ती आहे. बिहारमध्ये त्याला ‘मोदी गुल्लक’ म्हटलं जातं. सध्या ही बँक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या जयप्रकाश (Jay Prakash) या मूर्तीकाराने ही ‘मोदी गुल्लक’ मूर्ती तयार केली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू घोषित केल्यानंतर त्याला अशा प्रकारची बँक तयार करण्याची कल्पना सुचली. ही मनी बँक तयार करण्यासाठी आपल्याला महिनाभराचा कालावधी लागल्याचं त्याने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. जयप्रकाश म्हणाला, 'या बँकेमध्ये नाणी किंवा नोटांच्या स्वरुपात तब्बल एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम साठवून ठेवता येऊ शकते. यातून लहान मुलांना बचतीची सवय तर लागेलच, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून त्यांच्याप्रमाणे काम करण्याची प्रेरणाही त्यांना मिळेल.तसच या बँकेच्या माध्यमातून त्यांच्याबद्दलची माहितीही लहान मुलांना देता येईल. मोदी हे जगातील सर्वोत्तम पंतप्रधान आहेत. त्यामुळेच मी बँकेवर ‘दी बेस्ट पीएम इन दी वर्ल्ड’ असंही लिहिलं आहे.’ हे वाचा-नोकरी करणाऱ्यांना PNB देत आहे 3 लाखांचा लाभ, झिरो बॅलन्स असेल तरीही मिळतील पैसे ही बँक सोशल मीडियावर व्हायरल होत असली, तरीही जयप्रकाशला त्याचा म्हणावा असा फायदा झाला नाहीये. लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे त्याचा व्यवसाय बऱ्यापैकी मंदीतच आहे. आता जयप्रकाश आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. परिस्थिती सामान्य होऊ लागली, तर आपला व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येईल असा त्याचा विश्वास आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी त्यांचा पुतळा तयार होणं ही काही नवीन गोष्ट नाही. 2017 साली गुजरातमधील राजकोट शहरात तर एका व्यक्तीने मोदींचं मंदिरच (Modi Temple) उभारलं होतं. त्याही आधी 2016 मध्ये लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये (Madame Tussauds wax museum) मोदींचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला होता. या ठिकाणी त्यांचा ‘नमस्ते’ करतानाचा पुतळा आहे. यासोबतच, उत्तर प्रदेशमधील एक निवृत्त इंजिनिअर जे.पी. सिंह हे मोदींचा 100 फूट पुतळा बनवण्याच्या तयारीत आहेत. ते एक ‘मोदी मंदीर’ही उभारणार आहेत. मात्र या मंदिराला केवळ मोदींचं नाव असणार आहे; या ठिकाणी त्यांची पूजा केली जाणार नसल्याचंही सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
First published:

Tags: Bihar, PM narendra modi

पुढील बातम्या