INSIDE STORY नरेंद्र मोदी आणि इम्रान खान समोरासमोर आले आणि...

INSIDE STORY नरेंद्र मोदी आणि इम्रान खान समोरासमोर आले आणि...

मोदी यांच्यापासून खान हे तीसऱ्या क्रमांकावर बसले होते. मात्र दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांना बोलणं टाळलं.

  • Share this:

बिश्केक, 14 जून :  किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीत सर्वांचं लक्षं लागलंय ते भाराताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे. नरेंद्र मोदी हे इम्रान खान यांना भेटणार नाहीत असं भारतानं स्पष्ट केलं. तर मोदी आणि इम्रान खान यांची भेट व्हावी यासाठी पाकिस्तानने सर्व पातळीवर आटोकाट प्रयत्न केला. पण दहशतवाद आणि शांतता चर्चा एकाच वेळी सुरू राहूच शकत नाही असं भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं. या बैठकीदरम्यान मोदी आणि इम्रान खान अनेकदा समोरासमोर आले मात्र मोदींनी त्यांच्याकडे पाहिलंही नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

13 जूनच्या रात्री किर्गिझस्तानच्या राष्ट्रपतींनी सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांसाठी शाही मेजवानी दिली. या मेजवानीला पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांची पहिल्यांदा समोरासमोर आले. मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि इम्रान खान हे एकाच गोल टेबलवर जेवायला बसले होते.  मोदी यांच्यापासून खान हे तीसऱ्या क्रमांकावर बसले होते. मात्र दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांना बोलणं टाळलं.

पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान हे इतर नेत्यांशी अनौपचारिक चर्चा करत होते मात्र ऐकमेकांशी ते चकार शब्दही बोलले नाहीत. औपचारिक भेट झाली नाही तर किमान ते समोरासमोर आल्यावर केवळ शिष्टाचार म्हणून 'सलाम-दुआ' करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र पंतप्रधान मोदींनी आपली ताठर भूमिका कायम ठेवली.

इम्रान खानला सुनावले खडे बोल

नंतर उद्घघाटन कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता इम्रान खान यांना खडे बोल सुनावले. काही देश दहशतवादाला सर्व तऱ्हेचा पाठिंबा देत आहेत. असे देश म्हणजे मानवतेला धोका आहेत. सर्व जगाने अशा देशांना दहशतवादाला मदत करण्यापासून दूर केलं पाहिजे असं आवाहनही मोदी यांनी बोलताना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या