Home /News /national /

Shocking! खेळता खेळता 3 वर्षांच्या बाळाच्या डोळ्यात घुसली कात्री; वेदनेने विव्हळत राहिला

Shocking! खेळता खेळता 3 वर्षांच्या बाळाच्या डोळ्यात घुसली कात्री; वेदनेने विव्हळत राहिला

बाळाचा आवाज ऐकताच ते धावत गेले. बाळाची अवस्था पाहताच त्यांनाही धक्का बसला.

    जयपूर, 5 जानेवारी : खेळता-खेळता 3 वर्षांच्या बाळाच्या डोळ्याखाली कात्री घुसल्याचा प्रकार समोर (Scissors inserted into the eye of a 3 year old baby while playing) आला आहे. यानंतर वेदनेने बाळ जोरजोरात ओरडू लागलं. बाळाची अवस्था पाहता कुटुंबीयांना धक्काच बसला. गंभीर अवस्थेत बाळाला अजमेरमधील रुग्णालयात नेण्यात आलं. 10 मिनिटांपर्यंत ऑपरेशन केल्यानंतर कात्री बाहेर काढण्यात आली. ही घटना नागौर शहरातील आहे. सुदैवाने त्याची दृष्टीही व्यवस्थित आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. गजेंद्र घरात खेळत होता. यादरम्यान खेळता खेळता कात्रीच्या समोरील तब्बल 6 सेंटीमीरटपर्यंत भाग डोळ्यांच्या खालच्या भागात घुसला. ही घटना राजस्थान येथील नागोरी भागात घडली आहे. हे ही वाचा-झटपट श्रीमंतीच्या नादात गमावले 27 लाख; शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली लुटलं शस्त्रक्रियेनंतर बाळ सुखरूप.. डॉ.देवेंद्र शर्मा यांनी सांगितलं की, शस्त्रक्रियेनंतर बाळ पूर्णपणे सुखरूप आहे. यावेळी बाळाच्या कुटुंबीयांना अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की, कुटुंबीयांना धक्का बसला आहे. डोळ्याच्या खालच्या भागात 6 सेंटीमीटरपर्यंत कात्री घुसली होती. एस्किलेरादेखील डॅमेज झाला होता. मात्र सुदैवाने डोक्याला काही दुखापत झाली नाही. सुरुवातील वाहणारं रक्त थांबवण्यात आलं आणि नंतर कात्री बाहेर काढण्यात आली. लहान मुलांसोबत अनेकदा अशा घटना घडतात. कधी नाणं पोटात जाणं किंवा सेल खाणं अशीही घटना समोर आल्या आहेत. अशावेळी पालकांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. लहान मुलांजवळ अशा वस्तू ठेवू नये. लहान मुलांना हाताला लागेल ते तोंडात घालण्याची सवय असते, त्यामुळे त्यांच्याजवळ कोणतीही वस्तू ठेवताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Accident, Small baby

    पुढील बातम्या