Home /News /national /

...तर दोन महिन्यांत भारतात 13 लाख लोकांना होणार कोरोना, शास्त्रज्ञांचा इशारा

...तर दोन महिन्यांत भारतात 13 लाख लोकांना होणार कोरोना, शास्त्रज्ञांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारताला येणाऱ्या आव्हानासाठी तयार रहावे लागणार आहे.

    नवी दिल्ली, 25 मार्च : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारत सरकारने कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन असल्याची घोषणा केली मंगळवारी केली. मात्र असे असले तरी शास्त्रज्ञांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्य अशीच वाढल्यास मेपर्यंत ही संख्या तब्बल 13 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाबाबात शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी कमी टेस्ट केल्या आहेत. ही संख्या इतर देशांपेक्षा भारतात कमी आहे. 18 मार्चपर्यंत भारतात केवळ 11 हजार 500 चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळं ही गोष्ट भारतासाठी चिंताजनक आहे. वाचा-कोरोनाच्या लढाईत माणुसकीची परीक्षा; 6 वर्षाच्या मुलाचा अंत्यविधी रोखला, अखेर... एका भारतीय शास्त्रज्ञांनी मेडियम या माध्यमावर, “COVID-19च्या उपचारासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यांतून तिसऱ्या टप्प्यात गेल्या नंतर याचा परिणाम भारताच्या आरोग्या सेवा प्रणाली होईल. अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या रोखणे कठिण होईल", असे लिहिले आहे. वाचा-लॉकडाऊन दरम्यान सरकारचं काम कसं सुरू राहणार? हा आहे मोदींचा प्लान 'बी' असाच काहीसा प्रकार अमेरिका आणि इटलीमध्ये घडला. दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाताना इटलीमध्ये तिपटीने कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. वाचा-बेबी डॉलसोबत हॉटेलमध्ये राहणं पडलं महागात, 15 क्रिकेटपटूंना क्वारंटाईन भारताचा अमेरिका पॅटर्न “ भारताने सध्याची परिस्थिती आटोक्यात आणली असली तरी, येणारा काळ हा भारतासाठी धोकादायक असू शकतो,” असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले. सध्या भारत आणि अमेरिका यांचा कोरोना पसरण्याचा दर समान आहे. 19 मार्चपर्यंत भारताने अमेरिका पॅटर्न अंगीकारला आहे. तर, अमेरिकेतील रुग्णांची वाढ ही इटलीमध्ये होणाऱ्या वाढीसारखी होती. ज्यात साथीचा रोग सुरूवातीच्या काळात 11 दिवसांनी वाढला होता. वाचा-इटलीमध्ये कोरोनामुळे 743 जणांच्या मृत्यूचा रेकॉर्ड, जगातील 2.6 अब्ज लोक लॉकडाऊन सोयीसुविधांची कमतरता भारतातील लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे सोयीसुविधा कमी आहेत. भारतात सध्या 1000 लोकांसाठी केवळ 0.7 बेड आहेत. तर फ्रान्समध्ये 6.5, दक्षिण कोरिया 11.5, चीन 4.2, इटली 2.9 आणि अमेरिका 2.8. त्यामुळं इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती बिकट झाल्यास चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या