Black Fever: कालाजार रोगावर प्रतिबंधक लशीची चाचणी यशस्वी

Black Fever: कालाजार रोगावर प्रतिबंधक लशीची चाचणी यशस्वी

Varanasi News: IIT BHU च्या वैज्ञानिकांनी सांगितले की, Kala-azar वर लस तयार करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि आता मानवी चाचणी सुरू होणार आहे. यानंतर ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होईल.

  • Share this:

नवी दिल्ली,2 फेब्रुवारी :  भारतासह अशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका खंडात गंभीर रुप धारण केलेल्या कालाजार (Black Fever) या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान काशी हिंदू विश्वविद्यालय (IIT BHU) एक आशेचा किरण ठरु पाहत आहे. आयआयटी बीएचयूमधील स्कूल आॅफ बायोकेमिकल इंजिनिअरिंगने कालाजार प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. या पहिल्या टप्प्यातील यशानंतर,  अशी आशा आहे की भारतीय वैज्ञानिक पुन्हा एकदा आपले कर्तुत्व सिध्द करतील.

अशी काम करते लस

गंभीर स्वरुपाचा समजला जाणारा कालाजार हा आजार डासांमुळे फैलावतो. यावर प्रभावी ठरणारी लस आयआयटी बीएचयूमधील शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नातून ही लस विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. ही लस कालाजार रोगाचे प्रमुख कारण असलेल्या लीशमैनिया या परजीवीचे संक्रमण रोखते. या आजारावर जगभरात अद्याप कोणतीही लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे काही ठराविक औषधांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे हा डब्ल्यूएचओच्या (WHO) कालाजार निर्मुलन अभियानासाठी चिंतेचा विषय ठरत होता. परंतु, आता ही लस संजीवनी ठरणार आहे.

संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणसाठी लसीकरणच सुरक्षित

आयआयटी बीएचयूमधील स्कूल आॅफ बायोकेमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक विकासकुमार दुबे (कालाजार लसीचे प्रमुख) आणि नॅशनल पोस्ट डॉक्टरेल फेलो डॉ. सुनिता यादव यांनी सांगितले, की लसीकरण हा कोणत्याही संसर्गजन्य रोगाशी लढण्याचा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे. लसीतील अणू आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेला रोगाविरोधात लढण्याबाबत सक्षम करतात. लस ही आपल्या शरीरातील प्रतिपिंडे, साइटोकिन्स आणि इतर सक्रिय रेणू तयार करणाऱ्या प्रतिरक्षा पेशींना रोगाविरुध्द लढण्यासाठी उत्तेजित करते. यामुळे संसर्गापासून आपला बचाव होतो आणि आपल्याला दिर्घकालीन सुरक्षा मिळते.

रोगाच्या पूर्ण निर्मुलनासाठी उपयुक्त ठरेल लस

त्यांनी सांगितले, की लीशमैनियासिसच्या समूळ उच्चाटनासाठी ही लस उपयुक्त ठरेल. या लसीच्या रोगप्रतिरोधक क्षमतेचे मूल्यांकन प्री-क्लिनिकल अभ्यासादरम्यान उंदरावर करण्यात आले. यामुळे संसर्ग झालेल्या उंदरांमधील यकृत आणि प्लीहामधील जंतू लक्षणीय कमी झाल्याचे दिसून आले. लस दिलेल्या उंदरांमधील जंतूंचे निर्मूलन झाल्याचे दिसून आल्याने लस यशस्वी होण्याची शक्यता बळावली आणि अखेरीस ही लस यशस्वी झाली.

हे देखील वाचा - शेतकऱ्याचं हृदय वेळेत पोहोचवण्यासाठी सरसावली मेट्रो; माणुसकीबरोबर तंत्रज्ञानाचं संवेदनशील दर्शन

मानवी चाचण्यांना लवकरच सुरुवात होणार

त्यांनी सांगितले, की लस चाचणीची पहिली पायरी यशस्वी ठरली आहे. आता लवकरच मानवी चाचणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना ही लस उपलब्ध होईल. ही लस विकसित करण्याचे मोठे आव्हान आयआयटी बीएचयूमधील शास्त्रज्ञांसमोर होते. त्यात ते यशस्वी झाले.

डासांमुळे फैलावणाऱ्या या रोगावर भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलेला लसीचा पहिला टप्पा यशस्वी ठरला असून ही उत्साहवर्धक बाब आहे. लवकरच या लसीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी मिळेल. जर मानवी चाचणी यशस्वी झाली तर पुन्हा एकदा भारत एका नव्या लसीची भेट जगाला देईल आणि ही लस कालाजार (Black Fever) या रोगावरील रामबाण औषध ठरेल.

https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/varanasi-big-news-iit-bhu-scientists-made-incurable-disease-kala-azar-vaccine-passed-first-trial-upas-3443400.html

Published by: Aditya Thube
First published: February 2, 2021, 9:32 PM IST

ताज्या बातम्या