भाभा अणुसंशोधन केंद्रातला शास्त्रज्ञ बेपत्ता, 4 दिवसानंतर गूढ वाढलं

भाभा अणुसंशोधन केंद्रातला शास्त्रज्ञ बेपत्ता, 4 दिवसानंतर गूढ वाढलं

अभिषेक बार्कमध्ये काम करत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे जास्त काळजीपूर्वक तापस करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

  • Share this:

बंगळुरू 10 ऑक्टोबर: कर्नाटक (Karnataka) मधल्या भाभा अणुसंशोधन केंद्रात (Bhabha Atomic Research Center) (बार्क) काम करणारा एक तरुण शास्त्रज्ञ बेपत्ता आहे. अभिषेक रेड्डी गुल्ला (Abhishek Reddy Gulla) असं त्या शास्त्रज्ञाचं नाव असून तो 26 वर्षांचा आहे. म्हैसुरच्या  येलवाल येथून तो बेपत्ता आहे. अभिषेक 6 ऑक्टोबरला आपल्या बाईकने बाहेर गेला होता तेव्हापासून तो परतच आला नाही अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. आंध्र प्रदेश (Andra Pradesh) च्या मडनापल्ले इथला रहिवासी असलेला अभिषेक म्हैसुरच्या बार्कमध्ये दोन वर्षांपासून काम करतो आहे.

बार्कचे अधिकारी टी. के. बोस यांनी गुरुवारी यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय. 17 सप्टेंबरपासून तो कामावर आलेला नव्हता अशीही माहिती आहे.

5 ऑक्टोबरला बार्कमधून अभिषेकला कामावर केव्हा रुजू होणार याबाबत विचारणा केली होती. 6 ऑक्टोबरपासून कामावर पुन्हा येणार असं त्याने सांगितलं होतं मात्र तो आलाच नाही अशी माहितीही बोस यांनी दिली आहे.

अभिषेक गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता अशी माहिती मिळाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र त्याबाबत चौकशीनंतरच पूर्ण माहिती मिळेल असंही ते म्हणाले.

‘संघ’ मुस्लिमांना दुय्यम नागरिक समजतो, ओवेसींचा भागवतांवर निशाणा

6 ऑक्टोबरला तो बाईक घेऊन बाहेर पडला. त्यावेळी त्याने कुणालाच काही सांगितलं नाही. अभिषेकच्या घराचं दारही बंद केलेले नव्हते. त्याची गाडीही घरासमोर नव्हती अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.पोलिसांनी अभिषेकचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केलं असून ते या प्रकरणाचा तपास करत आहे.

पुलवामा चकमकीत 2 दहशतवादी ठार, 10 तासात सुरक्षा दलांनी केला 4 जणांचा खात्मा

आम्ही सगळ्या शक्यता गृहित धरून तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अभिषेक बार्कमध्ये काम करत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे जास्त काळजीपूर्वक तापस करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 10, 2020, 10:25 PM IST
Tags: police

ताज्या बातम्या