Home /News /national /

देशभरात लवकरच शाळा सुरू होणार, केंद्र सरकारकडून आदेश जारी होण्याची शक्यता

देशभरात लवकरच शाळा सुरू होणार, केंद्र सरकारकडून आदेश जारी होण्याची शक्यता

केंद्र सरकार (Central Govt) लवकरच शाळा (Schools) पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी करण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी: केंद्र सरकार (Central Govt) लवकरच शाळा (Schools) पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार कोविड-19 (Covid-19)शी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन करून ऑफलाईन (Offline Classes) वर्गांसाठी शाळा सुरू करण्याच्या मॉडेलवर काम करत आहे. कोरोनामुळे ऑफलाइन वर्ग बंद ओमायक्रॉन (Omicron) या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) नवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर देशातील बहुतेक भागांमध्ये शाळांचे ऑफलाइन वर्ग बंद करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे, अल्प कालावधी वगळता विद्यार्थी जवळपास दोन वर्षांपासून बहुतांश ऑनलाइन वर्ग घेत आहेत. सरकारकडून नवीन मॉडेलवर विचार सुरु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालक शाळा उघडण्याची मागणी करत असताना केंद्र सरकार कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन करून शाळा सुरू करण्याच्या मॉडेलवर काम करत आहे. Corona निर्बंधासंदर्भात केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय कोरोनाची सध्याची (current wave of corona) लाट बघता केंद्र सरकारने निर्बंध 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून महामारीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यास सांगितले आहे. त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 (Covid 19) संदर्भात आवश्यक सर्व खबरदारी पाळण्यास सांगितले आहे. अजूनही परिस्थिती ठिक नाही गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 407 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अजूनही 10 टक्क्यांहून अधिक आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, कोरोनाची सक्रिय प्रकरणे 22 लाखांहून अधिक आहेत. बहुतेक रूग्ण वेगाने बरे होत आहेत आणि रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे पण तरीही ही चिंतेची बाब आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत निर्बंधात वाढ एवढंच नाही तर 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 407 जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर 10 टक्क्यांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत सध्याचे निर्बंध 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवताना भल्ला यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा सध्याचा ट्रेंड पाहता सावधगिरी बाळगण्याची आणि दक्षता घेण्याची गरज आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्व खबरदारीचे पालन केले पाहिजे आणि त्यांची सुरक्षा धोक्यात येऊ देऊ नये.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, School, School student

    पुढील बातम्या