हवेतील प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीत शाळांना सुट्टी जाहीर

दिल्लीत आणि परिसरातील शहरात प्रदूषण इतकं तीव्र होतं की सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी धूर आणि धुक्यांमुळे दृष्यमानता दोनशे ते पाचशे मीटरदरम्यान मर्यादीत झाली होती

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2017 10:07 AM IST

हवेतील प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीत शाळांना सुट्टी जाहीर

दिल्ली,08 नोव्हेंबर: हवेच्या प्रदूषणात चार ते पाच पटींनी वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आज दिल्लीत पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. तसंच माध्यमिक शाळांतील विद्यार्थांना सकाळी शाळेत प्रार्थनेसाठी मैदानात जमण्यास मनाई करण्यात आलीय.

दिल्लीत आणि परिसरातील शहरात प्रदूषण इतकं तीव्र होतं की सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी धूर आणि धुक्यांमुळे दृष्यमानता दोनशे ते पाचशे मीटरदरम्यान मर्यादीत झाली होती. सकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुकं पसरल्यामुळं रनवेही बंद करण्यात आला. त्यामुळं अनेक विमानांची उड्डाणं प्रभावित झाली. दिल्लीत दाखल होणाऱ्या रेल्वेगाड्याही दिवसभर विलंबाने धावत होत्या.

तसंच दिल्लीत प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा सम विषम वाहतूक सुरू होऊ शकते असे इशारे दिल्ली सरकारने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 10:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...