13 वर्षांच्या मुलाने केली विमानांची चोरी, अधिकाऱ्यांनी दिली पायलट बनण्याची ऑफर

13 वर्षांच्या मुलाने केली विमानांची चोरी, अधिकाऱ्यांनी दिली पायलट बनण्याची ऑफर

तुम्ही चोरीच्या अनेक घटनांबद्दल ऐकलं असेल पण अशीही चोरी होऊ शकते याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. ही चोरीची घटना चीनमधली आहे. चीनमधल्या एका 13 वर्षाच्या मुलाला पायलट बनण्याचं एवढं वेड होतं की त्याने एअरपोर्टवरून दोन विमानं चोरण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

हुझोऊ (चीन), 24 जुलै : तुम्ही चोरीच्या अनेक घटनांबद्दल ऐकलं असेल पण अशीही चोरी होऊ शकते याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. ही चोरीची घटना चीनमधली आहे. चीनमधल्या एका 13 वर्षाच्या मुलाला पायलट बनण्याचं एवढं वेड होतं की त्याने एअरपोर्टवरून दोन विमानं चोरण्याचा प्रयत्न केला.

त्याची ही चोरी फारशी यशस्वी झाली नाही आणि नंतर सीसीटीव्ही फूटेजमुळे पकडलीही गेली. पण या चोरीबद्दल त्याला शिक्षा झाली नाही की दंडही बसला नाही. एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी त्याला या फसलेल्या चोरीबद्दल बक्षीसच दिलं. त्यांनी त्याला विमान चालवण्याचं प्रशिक्षण देणार असल्याचं जाहीर केलं.

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले हे कारण...

चीनमधल्या झिंजियांग प्रांतातल्या हुझोऊ शहरात ही घटना घडली. 15 जुलैला हुझोऊमधल्या एअरबेसवर दोन विमानं हँगरच्या बाहेर आलेली दिसली. या विमानांची स्थिती एवढी चांगली नव्हती. अधिकाऱ्यांनी इथलं सीसीटीव्ही फूटेज पाहिलं तेव्हा एक मुलगा या विमानांची चोरी करत असताना दिसला. हे पाहिल्यावर या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला पायलटचं ट्रेनिंग द्यायचं ठरवलं.या मुलाने विमान हँगरमधून बाहेर काढलं आणि टेक ऑफ घ्यायचा प्रयत्न केला. हा टेक ऑफ तितकासा नीट झाला नाही तरी त्याने दुसरं विमानही बाहेर काढलं आणि चालवून पाहिलं, हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालं.

VIDEO : भन्नाट देसी जुगाड, बाईकवर बसले तब्बल 11 जण!

या फूटेजवरून जेव्हा या मुलाचा शोध लागला तेव्हा अधिकारी त्याच्या घरी गेले. हा मुलगा शांतपणे होमवर्क करत होता. त्याच्या घरच्यांनाही त्याने केलेल्या कारनाम्यांची कल्पना नव्हती.

या मुलाने विमान चालवायचा प्रयत्न केल्याने विमानाचं सुमारे 80 हजार रुपयांचं नुकसान झालं. तरीही या मुलाचं विमान चालवण्याचं कौशल्य बघून त्याला वैमानिकाचं ट्रेनिंग देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

===============================================================================================

सलमानचा प्रेमळ अंदाज, आईसोबत डान्सचा VIDEO व्हायरल

First published: July 24, 2019, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading