नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर : नर्सरीमध्ये शिकणाऱ्या लहान मुलांपासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे यूनिफॉर्म बाजारात तयार मिळतात. कोणत्याही वयाच्या आणि कोणत्याही शाळेच्या विद्यार्थांसाठीचे यूनिफॉर्म बाजारात सहज उपलब्ध होतात. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात केवळ स्कूल यूनिफॉर्मचा व्यवसाय 6000 कोटी रुपयांचा आहे. परंतु कोरोनाच्या काळात या व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. शाळाच बंद असल्याचे हा व्यवसाय ठप्प झाला आहे.
मुलांसाठी पुस्तकं छापणाऱ्या एनसीईआरटी आणि सीबीएसई नुसार, बोर्डकडून मान्यता प्राप्त शाळा-कॉलेजांमध्ये 2 कोटींहून अधिक मुलं शिक्षण घेतात. एका आकडेवारीनुसार, 1.5 कोटी मुलं पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेतात. तर नववी आणि अकरावीमध्ये 30 लाख, हायस्कूलमध्ये 17 लाख आणि इंटरमध्ये 12 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. नर्सरी आणि केजीमध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या वेगळी आहे. या आकडेवारीत इतर बोर्डमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जोडली गेली नाही, जे बाजारातून स्कूल यूनिफॉर्म खरेदी करतात.
उत्तर भारतातील अनेक राज्यात तयार यूनिफॉर्मचा सप्लाय करणाऱ्या यूनिफॉर्म व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली ते आठवीमध्ये शिकणारी मुलं उन्हाळ्याच्या सीजनमध्ये ऍव्हरेज 2 हजार रुपयांचा यूनिफॉर्म खरेदी करतात. त्यामुळे या वयोगटात 4 हजार कोटी रूपयांच्या यूनिफॉर्मची विक्री होते. त्याशिवाय केजी-नर्सरीमध्ये विद्यार्थ्यांच्या यूनिफॉर्मचा 400 कोटींचा व्यवसाय होतो. 9वी ते 12वी पर्यंतचे सर्वच विद्यार्थी दरवर्षी यूनिफॉर्म खरेदी करत नाही, त्यानुसार केवळ 20 ते 25 टक्केच यूनिफॉर्म खरेदी होते.
हे वाचा - सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; आता येतंय Green Ration Card, जाणून घ्या याबाबत
यूपीच्या हाथरसमधून उत्तर भारतातील अनेक राज्यात आणि हरियाणातून बिहार, महाराष्ट्र आणि इतर दुसऱ्या राज्यात यूनिफॉर्म सप्लाय होतो. रोहतकमध्ये मोठ्या प्रमाणात यूनिफॉर्म शिवण्याच्या कार्यात तीन इंडस्ट्री जोडल्या गेल्या आहेत. यूनिफॉर्म शिवणाऱ्या उद्योगाशी जोडलेल्या व्यापाऱ्यांनी सांगतिलं की, शाळांमधून यूनिफॉर्मची ऑर्डर डिसेंबरमध्येच दिली जाते. त्यानंतर लुधियाना दिल्लीतून रॉ मटेरियल मागवलं जातं.
शाळांमध्ये 15 मार्चनंतर यूनिफॉर्म डिलिव्हरीचं काम सुरु होतं. एका सीजनमध्ये एक यूनिट जवळपास सव्वा ते दीड लाख यूनिफॉर्म तयार करतात. यावेळी मात्र रॉ मटेरियल फॅक्टरीमध्ये पडून आहे. यूनिफॉर्मची ऑर्डरच आली नाही. तयार यूनिफॉर्मही फॅक्टरीमध्ये तसेच आहेत. हे स्कूल यूनिफॉर्म असल्याने त्याला खुल्या बाजारातही विकू शकत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.