विद्यार्थ्यांचं नव्हे, शिक्षकाचंच झालं रॅगिंग; सरकारी शाळेतले प्रिन्सिपल त्रास देतात म्हणून पेटवून घेतलं

विद्यार्थ्यांचं नव्हे, शिक्षकाचंच झालं रॅगिंग; सरकारी शाळेतले प्रिन्सिपल त्रास देतात म्हणून पेटवून घेतलं

सरकारी शाळेत ही घटना घडली. गेस्ट टीचर म्हणून जाणाऱ्या या शिक्षकाने या छळाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतला.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : विद्यार्थ्यांचं रॅगिंग होतं, त्याच्या बातम्या येतात. एखाद्या विद्यार्थ्याचा शाळेत मानसिक छळ होतो, हेही ऐकलेलं असतं. पण शाळेतल्या एका शिक्षकाचीच मानसिक छळवणूक झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. तात्पुरत्या पदावर शिक्षक असलेल्या एका तरुणाला शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्रास दिला. मानसिक छळ केला, त्याला कंटाळून या शिक्षकाने चक्क पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

राजधानी दिल्लीच्या सरकारी शाळेत ही घटना घडली. गेस्ट टीचर म्हणून जाणाऱ्या या शिक्षकाने या छळाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतला. पेटवून घेण्याच्या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

दिल्लीच्या जैतपूर इथल्या मूलरचंद सरकारी शाळेत राहुल मलिक नावाचा शिक्षक गेस्ट लेक्चर घ्यायला जात असे. 2013 पासून तो या हंगामी स्वरूपाच्या कामावर आहे. पण शाळेचे मुख्याध्यापक गेस्ट टीचरच्या नियमानुसार त्याला ठरलेल्या दिवशी तासाला बोलवत नसत. शिवाय त्याने घेतलेल्या तासिकांच्या हिशोबाने त्याला पगारही देण्यात आला नव्हता, असं राहुल मलिकचं म्हणणं आहे.

आपला शाळेत मानसिक छळ होत असल्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं राहुलचं म्हणणं आहे. या छळाला कंटाळून त्याने कीटकनाशक किंवा धान्यरक्षक म्हणून वापरण्यात येणाऱ्या गोळ्या खाल्ल्या आणि स्वःला पेटवून घेतलं. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड करत आग विझवली. पण गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 4, 2020, 10:05 PM IST
Tags: delhi

ताज्या बातम्या