बिदर, 04 फेब्रुवारी : गेल्या आठडवड्यात तीन वेळा कर्नाटक पोलिसांनी बिदर इथल्या शाहीन प्रायमरी आणि हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. गुरुवारी एका विद्यार्थ्याच्या आईला आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना सीएए विरोधात नाटक केल्या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्या चपलाही जप्त केल्या आहे. या चपलांचा नाटकात वापर केल्यानं पोलिसांनी चपलासुद्धा ताब्यात घेतल्या.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, खुर्चीवर बसलेल्या विद्यार्थ्याची आई नजमुन्निसा आणि शाळेच्या मुख्याध्यापिका फरीदा बेगम यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अनेकदा शाळेत येऊन विद्यार्थ्यांची चौकशी करत आहेत. यामुळे सोशल मीडियावर पोलिसांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
पोलिसांनी नाटकात वापरलेल्या चपलासुद्धा जप्त केल्या आहेत. शाळेत सीएए विरोधात रचलेल्या नाटकात एक संवाद होता. त्यामध्ये जुते मारेंगें असं म्हटलं होतं. यामुळे पोलिसांनी पुरावा म्हणून चपला जप्त केल्या.नजमुन्निसा यांचा 9 वर्षांचा मुलगा आई तुरुंगातून बाहेर येण्याची वाट बघत आहे. त्याला जेव्हा विचारण्यात आलं की तुझी आई कुठं आहे तेव्हा तो ढसाढसा रडायला लागला. अद्याप याबाबत पोलिसांकडून किंवा शाळा प्रशासनाने प्रतिक्रिया दिलेली नाही.
देशात तुकडे-तुकडे गँगनंतर लव्ह जिहादही नाही, गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा
त्याच्या शाळेत 21 जानेवारीला मुलांनी सीएए विरोधात एक नाटक रचलं होतं. या नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच या नाटकामुळे शांतता भंग होत असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
काँग्रेसला झटका! बड्या नेत्याचा मुलगा भाजपमध्ये; वडील म्हणतात 'मला माहीत नाही' मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.