• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आता शाळांच्या घंटा वाजणार, 'या' राज्याने घेतला शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय!

आता शाळांच्या घंटा वाजणार, 'या' राज्याने घेतला शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय!

येत्या सोमवारपासून 6 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. त्याचबरोबर 10 वी आणि 12 वी चे वर्गही 23 सप्टेंबरपासुन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी दिली आहे.

 • Share this:
  दिल्‍ली, 6 सप्टेंबर : महाराष्ट्रात धार्मिक स्थळं उघडण्यावरून रणकंदन माजल्यानंतर आता शाळांबाबत (School Reopning) शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. अजून महाराष्ट्रात शाळा उघडण्याबाबत काही स्पष्टता नसल्यामुळे शाळकरी मुलांच्या (Students Future) भविष्याचं काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर शाळा उघडाव्यात अशी मागणी काही सामाजिक संघटना (Social Organization) करताना दिसत आहे. आता याच पार्श्वभूमीवर शाळांबाबत कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील (Karnataka Govt) शाळकरी मुलांसाठी मोठी खुशखबरी सरकारने दिली असुन येत्या सोमवारपासून 6 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. त्याचबरोबर 10 वी आणि 12 वी चे वर्गही 23 सप्टेंबरपासुन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री बी सी नागेश (K'Taka Education Minister B. C. Nagesh) यांनी दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकवर्गात समाधाचे वातावरण तयार झाले आहे. मोदी सरकारला हवीये तुमची एक छोटीशी मदत; 50 हजार रुपयांचं बक्षीसही जारी शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी हा निर्णय घेताना म्हटलं आहे की आम्ही हा निर्णय राज्याच्या टास्क फोर्स आणि कोरोनाविषयक समितीसोबत चर्चा करून घेतला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर शाळांमध्ये सर्व कोरोनाविषयक नियमांचे पालन केले जाईल. त्यामुळे आता कर्नाटकाच्या शाळांच्या घंटा वाजल्या परंतु महाराष्ट्रात शाळा कधी उघडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात अजून शाळांबाबत काहीही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा टाळेबंदीचे संकेत दिल्याने शाळांबाबतचा निर्णय लांबण्याची शक्यता आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: