शाळा तर सुटली पण चिमुकला जिगर शाळेतच अडकला...

शाळा तर सुटली पण चिमुकला जिगर शाळेतच अडकला...

आपल्या मुलांना पालक शाळेत पाठवतात ते शाळेच्या आणि शिक्षकांच्या भरवशावर. पण शिक्षकांनीच मुलांबद्दल बेपर्वाई दाखवली तर काय होऊ शकतं हे सांगणारी एक गंभीर घटना एका शाळेत घडली आहे.

  • Share this:

मेरठ, 8 मे : आपल्या मुलांना पालक शाळेत पाठवतात ते शाळेच्या आणि शिक्षकांच्या भरवशावर. पण शिक्षकांनीच मुलांबद्दल बेपर्वाई दाखवली तर काय होऊ शकतं हे सांगणारी एक गंभीर घटना उत्तर प्रदेशमधल्या एका शाळेत घडली आहे.

मेरठमधल्या एका शाळेत ही शिक्षिका शाळेची वेळ संपल्यावर वर्ग बंद करून गेली. यामध्ये पहिलीतला एक मुलगा वर्गातच राहिला आहे, हे या तिच्या लक्षातच आलं नाही. हा मुलगा तहानभुकेमळे मदतीसाठी ओरडत होता पण त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचलाच नाही.

6 वर्षांचा जिगर

पोलिसांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेचं कुलूप उघडलं आणि मुलाला बाहेर काढलं. मेठरमधल्या कुराली गावातली ही घटना आहे. 6 वर्षांचा हा जिगर गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतो. त्याचे चुलतभाऊसुद्धा याच शाळेत शिकतात. मंगळवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर हे तिन्ही भाऊ घरी पोहोचले पण जिगर शाळेतून आलाच नाही.

जिगरच्या घरच्यांनी गावात सगळीकडे त्याचा शोध घेतला पण तो कुठेच मिळाला नाही. त्याचवेळी या शाळेतल्या अंगणवाी केंद्रामध्ये काही महिला पौष्टिक आहार घेण्यासाठी तिथे गेल्या. तेव्हा त्यांना एका बंद खोलीत एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.

खिडकीतून दिलं पाणी

याबद्दल या महिलांनी पोलिसांना कळवलं. जिगरचे वडील मनोज आणि त्याची आजी पुष्पा हे शाळेत पोहोचले. शाळेचं कुलूप उघडेपर्यंत त्यांनी जिगरला खिडकीतून पाणी आणि खाण्यासाठी चिप्स दिले.

जिगरच्या नातेवाईकांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला. त्यावेळी शाळा उघडण्यात आली. शाळा सुटली तेव्हा जिगरला चुकून झोप लागली आणि त्यामुळे त्याला काहीच कळलं नाही. शिक्षिकेनेही वर्गाला कुलूप ठोकलं आणि ती घरी निघून गेली.

शिक्षकांनी घ्यावा धडा

जिगरच्या नातेवाईकांनी शिक्षकांवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आबे, याबद्दल त्या शिक्षिकेची चौकशी होईल, असं शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे. पण या शिक्षिकेचा बेजबाबदारणा या छोट्याशा मुलाच्या जीवावर बेतला असता हे लक्षात घ्यायला हवं.

=========================================================================================

SPECIAL REPORT : नगरच्या 'सैराट'ची खरी कहाणी आणि काही अनुत्तरीत प्रश्न!बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 08:30 PM IST

ताज्या बातम्या