Home /News /national /

‘या’ सरकारी शाळेत मुलांनाही येते मासिक पाळी? संपूर्ण प्रकरण जाणून बसेल धक्का

‘या’ सरकारी शाळेत मुलांनाही येते मासिक पाळी? संपूर्ण प्रकरण जाणून बसेल धक्का

सरकारकडून फक्त मुलींना देण्यासाठी येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनच्या योजनेची पूर्ण रक्कम (money) अनेक मुलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली 24 जानेवारी : मुलींना आणि महिलांना मासिक पाळी (Periods) येते. पण कधी मुलांना (Boys) मासिक पाळी आल्याचं तुम्ही ऐकलंय का?, आता तुम्ही विचार करत असाल की हा काय प्रश्न आहे. पण असाच प्रश्न उपस्थित करायला लावणारा प्रकार बिहारमधून समोर आला आहे. बिहारमध्ये मुलींना सॅनिटरी नॅपकिन (Sanitary Napkin) योजनेचा लाभ दिला जातो. परंतु सारण जिल्ह्यातील मांझी ब्लॉकच्या हलखोरी साह हायस्कूलमध्ये (High School) मुलींसोबतच मुलांनादेखील सॅनिटरी नॅपकिन आणि ड्रेस (Dress) योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या शाळेत फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठी निधी मंजूर केल्याचा प्रकार घडला आहे. आयुष्यभर पुरुष म्हणून जगला 3 मुलांचा पिता; 67व्या वर्षी झाला धक्कादायक खुलासा झालं असं की, या शाळेचे माजी मुख्याध्यापक (Headmaster) रिटायर झाले. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या नव्या मुख्याध्यापकांनी पदभार स्वीकारल्यानंतर शाळेतील जुन्या योजनांच्या वापराचे प्रमाणपत्र मागितले. त्यानुसार या शाळेत सुमारे एक कोटी रुपयांच्या योजनांमध्ये गडबड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या शाळेत मुलींसह मुलांनाही सॅनिटरी नॅपकिन आणि ड्रेस योजनेचा लाभ देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. शाळेच्या माजी मुख्याध्यापकांनी तयार केलेल्या कागदपत्रांवरून असं दिसून येतं की त्यांच्या शाळेतील मुलींसह मुलांनाही मासिक पाळी येत होती. या संदर्भात लोकमत न्यूजने वृत्त दिलंय. शिक्षण विभागाने नवीन मुख्याध्यापकांकडून जुन्या योजनांचे उपयोग प्रमाणपत्र मागितले असता सुमारे एक कोटी रुपयांच्या योजनांचे उपयोग प्रमाणपत्र सादर करण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आणि बँकेचे स्टेटमेंट (bank statement) तपासण्यात आले. त्यामध्ये राज्यात केवळ मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांची रक्कम मुलांच्या खात्यातही जमा करण्यात आल्याचे आढळून आले. सरकारकडून फक्त मुलींना देण्यासाठी येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनच्या योजनेची पूर्ण रक्कम (Money) अनेक मुलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे डोंगर; अरूंद रस्त्यावर वळवू लागला कार अन्.., VIDEO

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर नवीन मुख्याध्यापकांनी या शाळेतील आणखी अनेक अनियमितता शोधून काढल्या आहेत. तसेच त्यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रात शाळेतील मुले सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे पत्र समोर आल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली असून याप्रकरणी शिक्षण विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तर, तपासात शाळेत पैशांची करण्यात आलेली गडबड आणि मुलांनाही या योजनेचा लाभ देण्यात आल्याची बाब खरी असल्याचे आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण विभागाचे डीपीओ राजन गिरी यांनी सांगितले. पैशांसाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. या शाळेत तर पैशांसाठी मुलींऐवजी चक्क मुलांनाही मासिक पाळी येत असल्याचं म्हणत योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
First published:

Tags: Periods, School

पुढील बातम्या