नाटकात मुलगा झाला होता इंग्रज, नंतर भगतसिंग यांच्यासारखा चढला फासावर आणि...

नाटकात मुलगा झाला होता इंग्रज, नंतर भगतसिंग यांच्यासारखा चढला फासावर आणि...

ज्ञानसागर शाळेत देशासाठी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतीकारक भगतसिंग यांच्यावर मुलांनी 1 फेब्रुवारी रोजी शाळेत नाटक बसवलं होतं

  • Share this:

मध्य प्रदेश, 06 फेब्रुवारी : लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा, असा सल्ला नेहमी डॉक्टर देत असतात. परंतु, मोबाइलमध्ये भगतसिंग यांचं नाटक पाहून त्यातील सीन सत्यात करण्याचा प्रयत्न एका चिमुरड्याच्या जीवावर बेतला आहे.

मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील बडवान गावातील ज्ञानसागर शाळेत देशासाठी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या भगतसिंग यांच्यावर मुलांनी 1 फेब्रुवारी रोजी शाळेत नाटक बसवलं होतं. शाळेतील या नाटकामध्ये प्रियांशू विनोद मालविया (वय 12) याने सहभाग घेतला होता. प्रियांशूने या नाटकात इंग्रजाची भूमिका साकारली होती. दुसऱ्या दिवशी प्रियांशूने घरी गेल्यावर भगतसिंग यांना ज्या प्रकार फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती याच घटनेचा प्रयत्न त्याने केला. शेतातीत एका झोपडीत त्याने या नाटकातील सीन खरोखर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गळ्याला फास बसल्यामुळे या चिमुरड्याचा मृत्यू झाला.  या मुलाजवळ एक मोबाइल सापडला. यामध्ये भगत सिंग यांच्यावरील आधारीत नाटकाची क्लिप मिळाली.

पोलिसांनी सांगितलं की, प्रियांशू हा भगतसिंग यांच्या नाटकाची व्हिडिओ क्लिप पाहून तसा प्रयत्न करत होता. आधी तो पलंगावर उभा राहिला आणि त्यानंतर गळफास घेण्याचा ड्रामा केला. पण, तोल गेल्यामुळे तो खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला.  पोलिसांनी या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून मंदसौर इथं पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

ही घटना सोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झाली. मृत्यू झालेल्या मुलाने शाळेत नाटकात भाग घेतला होता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. पोलिसांनी आवाहन केलं आहे की, पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाइल देणं टाळावं, मुलं व्हिडिओ पाहून त्याचं अनुकरण करतात. मंदसौरमध्ये या मुलाने व्हिडिओ पाहून त्याचं अनुकरण केलं आणि तेच त्यांच्या जीवावर बेतलं. त्यामुळे आपल्या मुलांना मोबाइल देण्याचं टाळावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

गॅस गिझर ठरतोय ‘गॅस बॉम्ब’, मुंबईनंतर पुण्यातही एकाचा मृत्यू

दरम्यान,  पुण्यात अंघोळ करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय.  अंघोळ करताना बाथरूमधील गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्यानं तरुणाचा जीव गेलाय. पुण्यातील उचभ्रू अशा कोथरूड भागातल्या संगम सोसायटीतल्या घटनेनं एकच खळबळ उडाली.

आई-वडील बाहेरगावी गेल्यानं रामराजे सकपाळ हा 30 वर्षाचा तरुण घरात एकटाच होता. घरातून दुर्गंधी येत असल्यानं सोसायटीतील लोकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तात्काळ धाव घेत अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, तेव्हा रामराजे सकपाळ मृत अवस्थेत आढळले. शवविच्छेदनातून समोर आलेलं मृत्यूचं कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. अंघोळ करताना गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबई पुण्यासारख्या शहरांबरोबर अगदी छोट्या शहरातही वीजेची बचत करण्यासाठी घरात गॅस गिझर लावण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण, हाच गॅस गिझर घरातला बॉम्ब ठरतोय. गेल्या काही दिवसात गॅस गिझरमधून होणाऱ्या गॅस गळतीनं अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत.

First published: February 6, 2020, 6:13 PM IST

ताज्या बातम्या