coronavirus : ....तर 15 मे पर्यंत शाळा-कॉलेज, मॉल आणि धार्मिक स्थळ बंद राहणार

कोरोनाचा परिणाम साऱ्या जगावर झाला आहे. भारतातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे धार्मिक स्थळांवरही कोरोनाचा परिणाम दिसत आहे.

कोरोनाचा झपाट्यानं वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 08 एप्रिल : कोरोनाचा झपाट्यानं वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरीही त्यानंतर अनेक गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कोरोनाचा झपाट्यानं वाढणारा संसर्ग थांबवायचा असेल तर 15 मे पर्यंत देशभरातील अनेक शाळा-कॉलेज, मॉल आणि धार्मिक स्थळ बंद ठेवणं गरजेचं आहे. तिथे नागरिकांना येण्यास काही कालावधिसाठी बंदी घालण्याची शिफारस मंत्रिमंडळाकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांमधील लॉकडाऊनही 21 दिवसांनंतर म्हणजेच 14 एप्रिलनंतर वाढवला जाऊ शकतो. असं असलं तरीही देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना, शाळा, महाविद्यालयं, उद्यानं आणि मॉल्स 15 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मोदी सरकार घेण्याच्या तयारीत असल्याची माहितती सूत्रांकडून मिळत आहे. हे वाचा-सर्दी, खोकला, तापाशिवाय कोरोनाची आणखी नवी लक्षणं, दुर्लक्ष करू नका चीनमधील वुहानमध्ये 76 दिवसानंतर लॉकडाऊन संपला असताना जगभरात मात्र कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. इटली फ्रान्स सारख्या देशांमध्ये हजारोंच्या संख्येनं लोकांचा मृत्यू होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर भारतातही आता कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 5 हजार पर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशभऱात आतापर्यंत 4 हजार सातशेहून अधिक केसेस अॅक्टीव असल्याचं समोर आलं आहे. तर सर्वात जास्त रुग्ण 1 हजारहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात तर मुंबईत जवळपास 500 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. वारंवार प्रशासनाकडून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असतानाही कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात वेगानं वाढताना दिसत आहे. देशभरात 24 तासांत 508 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा-बापरे! कोरोनापासून तुमचं संरक्षण करणा-या मास्कवर तब्बल आठवडाभर असतो व्हायरस संपादन- क्रांती कानेटकर.
    First published: