शाळेत यस सर आणि यस मॅडमऐवजी म्हणा 'जय हिंद'

शाळेत यस सर आणि यस मॅडमऐवजी म्हणा 'जय हिंद'

मध्य प्रदेश सरकारनंतर आता गुजरात सरकारनेही शाळांमध्ये जय हिंदच्या घोषणा देण्याचे आदेश काढले आहेत.

  • Share this:

गुजरात, 01 जानेवारी : मध्य प्रदेश सरकारनंतर आता गुजरात सरकारनेही शाळांमध्ये जय हिंदच्या घोषणा देण्याचे आदेश काढले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा आदेश काढण्यात आला आहे. शाळांमध्ये मुलांनी हजेरी देताना जय हिंद किंवा जय भारत अशा घोषणा द्यायच्या आहेत. हा नवा आदेश गुजरात सरकारच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्र सिंह चुडासमा यांच्या सागंण्यानुसार, 'लहान मुलांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे.' यासंर्भातले नोटिफिकेशनसुद्धा मोबाईलद्वारे जारी करण्यात आले आहे. तर दुसरीकडे देशभक्तीबरोबरच शाळांमध्ये आणि शिक्षणामध्ये ही बदल हवा अशी भूमिका शिक्षण विभागाची आहे.

15 मे 2018ला मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने हा नियम जारी केला होता. हा नियम खासगी आणि सरकारी अशा सगळ्या शाळांना लागू करण्यात आला होता.

काय आहे हा नियम?

मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांची हजेरी घेतली जाते. त्यावेळी प्रत्येकाचा रोल नंबर पुकारला जातो. त्यावर मुलं 'यस सर' किंवा 'यस मॅडम' असं म्हणतात. तर लागू केलेल्या या नव्या नियमानुसार यस सर म्हणण्या ऐवजी 'जय हिंद' असं बोलायचं.

सिग्नल तोडल्यानंतर 'त्याने' ट्राफिक पोलिसालाच नेलं फरफटत; घटना CCTV मध्ये कैद

First published: January 1, 2019, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading