जगभरात खळबळ माजवणाऱ्या गोव्यातल्या स्कारलेट एडन हत्येप्रकरणी एक जण दोषी

गोव्यामध्ये झालेल्या स्कारलेट एडन हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने एका इसमाला दोषी ठरवलं आहे. गोव्यामधल्या अंजुना बीचवर स्कारलेट मृतावस्थेत आढळली होती. 18 फेब्रुवारी 2008 ला हा खुनाचा प्रकार उघडकीला आला होता.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 09:21 PM IST

जगभरात खळबळ माजवणाऱ्या गोव्यातल्या स्कारलेट एडन हत्येप्रकरणी एक जण दोषी

पणजी, 17 जुलै : गोव्यामध्ये झालेल्या स्कारलेट एडन हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने एका इसमाला दोषी ठरवलं आहे. गोव्यामधल्या अंजुना बीचवर स्कारलेट मृतावस्थेत आढळली होती. 18 फेब्रुवारी 2008 ला हा खुनाचा प्रकार उघडकीला आला होता. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. गोव्यामधले दोन स्थानिक सॅमसन डिसूझा आणि प्लॅकिडो कार्व्हालो यांनी स्कारलेटवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला होता. गोव्यामधल्या मुलांसबंधीच्या खटल्यांचं कामकाज पाहणाऱ्या न्यायालयाने या दोघांची गेल्या वर्षी सुटका केली होती.

(वाचा : कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा, फाशीच्या शिक्षेला स्थगिती)

कोर्टाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करण्यात आलं होतं. त्यावर कोर्टाने या सॅमसन डिसूझा याला दोषी ठरवलं. आता या प्रकरणी त्याला कोणती शिक्षा होणार हे 19 जुलैला कळू शकेल. हायकोर्टाने प्लॅसिडो कार्व्हालो याच्या सुटकेचा निर्णय मात्र कायम ठेवला.

(वाचा :महिला कॉन्स्टेबलनं ASIची केली हत्या,नंतर त्याच्या कुशीत बसून केली आत्महत्या)

तपास सीबीआयकडे

Loading...

या प्रकरणाची चौकशी पहिल्यांदा गोवा पोलीस करत होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. गोवा सरकारनेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. स्कारलेटची आई फिओना मॅकोन यांनी या चौकशीबद्दल शंका उपस्थित केल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला होता. स्कारलेट ही ब्रिटनमधली मुलगी गोव्यामध्ये पर्यटनासाठी आली असताना तिचा अशा प्रकारे निर्घृण खून करण्यात आला.

या घटनेमुळे गोव्यातल्या परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता या प्रकरणात दोषी ठरलेल्या सॅमसन डिसूझाला कोणती शिक्षा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

=======================================================================================

VIDEO : आंतरराष्ट्रीय कोर्टात काय घडलं? उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...