Home /News /national /

सरकारला धक्का, आणखी एका बड्या कंपनीने बँकांना घातला 600 कोटींचा गंडा

सरकारला धक्का, आणखी एका बड्या कंपनीने बँकांना घातला 600 कोटींचा गंडा

आता कोरोना आणि लॉडाऊनमुळे अर्थव्यवस्था संकटात असतानाच असे घोटाळे उघडकीस आल्याने सामान्य माणसांच्या बँकांवरच्या विश्वासाला तडा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

    नवी दिल्ली 4 जुलै: कोरोनामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. सगळे व्यवहार मंदावले आहेत. बाजारातला खेळता पैसा आटला आहे. लोकांची मदार आता बँकांवर आहे. अशा परिस्थितीत आणखी एका बड्या कंपनीने बँकांना 600 कोटींचा गंडा घातल्याची घटना उघडीस आली आहे. दिल्लीची ऑप्टिक फायबर निर्माता असलेल्या अक्ष ऑप्टिफायबर (Aksh Optifiber) या कंपनीमध्ये हा घोटाळा झाला आहे. कंपनीच्या संचालक बोर्डाच्या एका सदस्यांनीच हा गंभीर घोटाळ्याचा आरोप केला आहे. कंपनीच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक असलेले अरविंद गुप्‍ता यांनी हा आरोप केला आहे. कंपनीचा आर्थिक व्यवहार करताना गुंतवणूकदार आणि बँकांचे 600 कोटी रुपये बुडविण्यात आले आहेत असा आरोप गुप्ता यांनी पत्र लिहून अर्थमंत्रालयाला केला आहे. त्याचबरोबर खोट्या कंपन्या बंनवून त्यात गुंतवणूक करण्यात आली आहे. विदेशातून आयात केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे दाखवूनही हेराफेरी करण्यात आल्याचा आरोपही गुप्ता यांनी आपल्या पत्रात केला आहे. पावसाचा Red Alert : ठाण्याची बाजारपेठ आणि एसटी स्टँड पाण्यात; मुंबईत NDRF सतर्क या आधी नीरव मोदी, मेहूल चोक्सी, विजय मल्ल्या यांनी बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून विदेशात पलायन केलं होतं. आता कोरोना आणि लॉडाऊनमुळे अर्थव्यवस्था संकटात असतानाच असे घोटाळे उघडकीस आल्याने सामान्य माणसांच्या बँकांवरच्या विश्वासाला तडा जाण्याची भीती व्यक्त होत आहे. एक नंबर! फक्त 60 सेकंदात 'या' भारतीयानं साऱ्या जगाला शिकवलं फिजिक्स या पत्रानंतर अर्थविश्वात खळबळ उडाली असून अर्थमंत्रालय आता कुठला निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या आधीच आरबीआयने बँकांना कडक निर्देश देत सर्व व्यवहार काळजीपूर्वक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही असे प्रकार घडत आहेत. अशाच घोटाळ्यांमुळे आरबीआयने अनेक बँकांवर निर्बंधही घातले होते. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. संपादन - अजय कौटिकवार    
    First published:

    पुढील बातम्या