• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • Lakhimpur Violence: लखीमपूर हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, आज होणार सुनावणी

Lakhimpur Violence: लखीमपूर हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, आज होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी लखीमपूर खीरी घटनेची (Lakhimpur Kheri Violence) स्वतःहून दखल घेतली आहे. आज या प्रकरणावप सुनावणी होणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी लखीमपूर खीरी घटनेची (Lakhimpur Kheri Violence) स्वतःहून दखल घेतली (SC takes Cognizance of Lakhimpur Incident) आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमाना यांचं खंडपीठ आज (गुरुवारी) या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. सुनावणी सीजेआयच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाद्वारे होणार आहे. ज्यात CJI NV रमणा तसेच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश आहे. मंगळवारी देखील लखीमपूर खीरी प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी गृह मंत्रालय आणि पोलिसांना निर्देश देण्याची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मंत्र्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यात करण्यात आली आहे. Lakhimpur Kheri Case : सचिन पायलट यांनाही अडवलं; पोलिसांनी घेतलं ताब्यात दोन वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, ज्यामध्ये सीबीआयचाही सहभाग असावा अशी मागणी करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण - लखीमपूर खीरीचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मूळ बनबीरपुर गावात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी येणार होते. याचाच विरोध शेतकरी करत होते मात्र यादरम्यानच झालेल्या दंग्यात . आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचाही समावेश होता. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, मिश्रा यांचा मुलगा ज्या एसयूव्हीमध्ये बसला होता, त्याने शेतकऱ्यांना चिरडले आणि त्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, म्हणाले... या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापलं आहे. विरोध पक्ष या घटनेसाठी भाजपला जबाबदार ठरवत आहेत.यादरम्यान बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka gandhi) सीतापुरमधून लखीमपुर खीरीसाठी रवाना झाले. लखीमपुर खीरी येथे जाण्यासाठी लखनऊ विमानतळावर पोहोचलेल्या राहुल गांधींना आपल्या वाहनाने जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. यामुळे याच्या विरोधात ते विमानतळाच्या परिसरातच धरणे आंदोलनाला बसले. यादरम्यान त्यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला. मात्र, काहीच वेळात प्रकरण शांत झालं आणि राहुल गांधी सीतापुरसाठी रवाना झाले. राहुल यांना आपल्या गाडीनं सीतापुर आणि लखीमपुर येथे जायचं होतं. मात्र, प्रशासनही त्यांना आपल्याच गाडीनं घेऊन जाण्यावर अडून राहिलं.
    Published by:Kiran Pharate
    First published: