• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • SC, ST मतदारांना हवेत नरेंद्र मोदी; निवडणुकीत फिरवली बाजी

SC, ST मतदारांना हवेत नरेंद्र मोदी; निवडणुकीत फिरवली बाजी

SC, ST मतदारांनी देखील भाजपला भरघोस मतदान केल्याचं आकडेवारीवरून दिसून होतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 मे : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप, NDAला लोकसभा निवडणुकीत 2014 पेक्षा देखील मोठं यश मिळालं. 2014मध्ये भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. तर, 2019मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या आहेत. NDAची आकडेवारी ही 350 आहे. यामध्ये लक्षवेधी बाब म्हणजे 10 जागी भाजपनं अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे SC, ST मतदारांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याचं देखील दिसून येत आहे. सर्व आकडेवारीचा विचार करता 131 आरक्षित जागांपैकी भाजपला 77 जागांवर विजय मिळाला आहे. तर, 2014मध्ये हाच आकडा 67 होता. भाजपवर पाच वर्षाच्या कार्यकाळात जातीयवादी, दलित विरोधी असल्याचा आरोप लावला गेला. पण, 2019ची आकडेवारी पाहता भाजपवर लावलेले आरोप मतदानातून सिद्ध होताना दिसत नाहीत. त्यामुळे SC, ST मतदार देखील भाजपच्या पाठिशी असल्याचं म्हणता येईल. निवडणुकीनंतर अखेर काय होतं EVMचं? जाणून घ्या... काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ 2014ची तुलना करता काँग्रेसच्या जागा देखील वाढल्या आहेत. काँग्रेसला 2014मध्ये 44 जागा होत्या. तर, 2019मध्ये हाच आकडा 52वर पोहोचला आहे. पण, पक्षाला 3 आरक्षित जागांवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2014मध्ये काँग्रेसला 12 आरक्षित जागांवर विजय मिळाला होता. पण, 2014मध्ये हीच संख्या 12 वरून 9 झाली आहे. बसपाला किती जागा मिळाली उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सर्व्हेसर्वा मायावती यांना 2014मध्ये 17 आरक्षित जागांवर विजय मिळाला होता. पण, 2019मध्ये हा आकडा केवळ दोन आहे. उर्वरित राज्यांमध्ये तर बसपाला आपलं खाता देखील खोलता आलं नाही. बसपाचा उत्तर प्रदेशातील मतदार हा दलित वर्गातील आहे. पण, इतर राज्यांमध्ये मात्र बसपा आपला प्रभाव पाडू शकला नाही. SPECIAL REPORT: पुणेकराची झोपमोड करणाऱ्या कोंबड्याला अटक होणार?
  First published: