• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • अॅट्रॉसिटीच्या निकालावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

अॅट्रॉसिटीच्या निकालावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात दिलेल्या निकालावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं आज नकार दिलाय. ज्या लोकांनी रस्त्यावर धुमाकूळ घातला त्यांनी कोर्टाचा निकाल वाचलेला नाही. काही वेळेला केवळ हितसंबंध आणि स्वार्थासाठी असे प्रकार केले जातात असही सांगत सुप्रीम कोर्टानं कडक ताशेरे ओढले. पुढची सुनावणी दहा दिवसांनी होणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली,03 एप्रिल : अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात दिलेल्या निकालावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं आज नकार दिलाय. ज्या लोकांनी रस्त्यावर धुमाकूळ घातला त्यांनी कोर्टाचा निकाल वाचलेला नाही. काही वेळेला केवळ हितसंबंध आणि स्वार्थासाठी असे प्रकार केले जातात असही सांगत सुप्रीम कोर्टानं कडक ताशेरे ओढले. आम्ही कायद्याच्या विरोधात नाही, फक्त निर्दोष माणसं तुरूंगात जावू नयेत एवढीच आम्हाला काळजी आहे. कुठलीही खातरजमा न करता सरकारनं लोकांना अटक करावी असं वाटतं का? असा सवालही कोर्टानं केलाय. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुप्रिम कोर्टानं 20 मार्चला दिलेल्या निकालाविरूध्द विविध दलित संघटनांनी सोमवारी भारत बंद पुकारला होता. तर काँग्रेससह विविध पक्षांनी या निकालाला विरोध करत केंद्र सरकारला जबाबदार धरलं होतं. कालच्या बंददरम्यान अनेक राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात 9 लोकांचा मृत्यू झाला होता. परिस्थिती गंभीर बनल्यानं केंद्र सरकारनं तातडीनं फेरविचार याचिका न्या. आदर्श कुमार गोयल आणि न्या. लळित यांच्या खंडपीठापुढे दाखल केली. मात्र निकालावर स्थगिती देण्यास नकार देत या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 एप्रिलला होणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणात जे पक्षकार आहेत त्यांनी आपली बाजू तीन दिवसांमध्ये मांडावी असे आदेशही कोर्टानं दिले आहेत.  

First published: