S M L

अॅट्रॉसिटीसंदर्भात सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत

अॅट्रॉसिटीसंदर्भात सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे. सुप्रीम कोर्टाने पुनरावलोकन याचिका फेटाळली तर सरकार अध्यादेश काढणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 18, 2018 01:50 PM IST

अॅट्रॉसिटीसंदर्भात सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत

18 एप्रिल : अॅट्रॉसिटीसंदर्भात सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे. सुप्रीम कोर्टाने पुनरावलोकन याचिका फेटाळली तर सरकार अध्यादेश काढणार आहे.

अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तात्काळ अटक न करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात दलितांनी नाराजी व्यक्त केलीय. त्याविरोधात मोर्चेही निघाले होते.

केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी तसे सूतोवाच केले आहेत. सरकारसाठी सर्व मार्ग खुले आहेत. केंद्राचे कायदा मंत्रालय यावर अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहेत. कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात याबाबत चर्चाही झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परंतु सरकारकडून अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया सार्वजनिक करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अॅट्रॉसिटीसंदर्भात याचिकाही दाखल करत निर्णयात बदल करण्याची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close