S M L

सरन्यायाधीशांच्या विरुद्ध कटाचे पुरावे सादर, कोर्टाकडून पोलीस आयुक्तांसह CBI संचालकांना नोटीस

एका महिलेने सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.

Updated On: Apr 24, 2019 03:43 PM IST

सरन्यायाधीशांच्या विरुद्ध कटाचे पुरावे सादर, कोर्टाकडून पोलीस आयुक्तांसह CBI संचालकांना नोटीस

नवी दिल्ली, 24 एप्रिल : सरन्यायाधीशांवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि सीबीआयच्या संचालकांना नोटीस बजावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. हा आरोप फेटाळून लावत त्यांनी उत्तर देण्याचं नाकारलं. सरन्यायाधीश गोगोई म्हणाले की, न्यायसंस्था धोक्यात आहे. पुढच्या आठवड्यात काही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी असून मुद्दाम अशा प्रकारचे आरोप केले जात आहे.

एका महिलेने सरन्यायाधीश गोगोई यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यावर सर्वोच्च न्यायाल्याने विशेष सुनावणी घेतली. यावेळी गोगोई यांनी सांगितले की, 20 वर्ष न्यायसंस्थेत काम केल्याचं हे फळ आहे की? 20 वर्षांच्या सेवेनंतर माझ्या खात्यात 6 लाख 80 हजार रुपये आहेत.


न्यायसंस्थेला बळीचा बकरा करता येणार नाही. लोकांना ही संस्था बरखास्त करायची आहे. यासाठीच अशाप्रकारचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असं गोगोईंनी सांगितलं होतं.


VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्ष

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: sc
First Published: Apr 24, 2019 12:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close