'जन-गण-मन'ची तुलना 'वंदे मातरम्'सोबत होऊ शकत नाही,सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

'जन-गण-मन'ची तुलना 'वंदे मातरम्'सोबत होऊ शकत नाही,सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

या याचिकेत या कायद्यात बदल करून वंदे मातरमचा समावेश करावा अशीही मागणी करण्यात आली होती.

  • Share this:

12 डिसेंबर : सुप्रीम कोर्टाने वंदे मातरम् ला राष्ट्रगान जन-गण-मनच्या बरोबरचा दर्जा देण्यास नकार दिलाय. कोर्टाने या बाबतची जनहित याचिका फेटाळून लावलीये.

वंदे मातरम् गिताचा अपमान करणाऱ्यांवर राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी होणारी कारवाई करावी अशी मागणी एका जनहित याचिकेत करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने ही जनहित याचिका निकाली काढत वंदे मातरमला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा देण्यास नकार दिली.

1971 मध्ये तयार करणाऱ्या आलेल्या कायद्यानुसार कुणीही जन-गण-मन राष्ट्रगानाचा अपमान करू शकत नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

या याचिकेत या कायद्यात बदल करून वंदे मातरमचा समावेश करावा अशीही मागणी करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही मागणीही फेटाळून लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 09:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading