मराठी बातम्या /बातम्या /देश /

ठाकरेंना आणखी एक झटका! परमबीर सिंह यांच्याविरोधातील 'ती' याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

ठाकरेंना आणखी एक झटका! परमबीर सिंह यांच्याविरोधातील 'ती' याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

महाविकासआघाडीला आता आणखी एका धक्क्याला सामोरं जावं लागणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या पुनर्विविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 20 जुलै : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकासआघाडीला रोज नवनवीन धक्के बसत आहेत. शिंदे सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना ब्रेक लावण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे कोर्टातूनही अद्याप ठाकरेंना कोणताच दिलासा मिळालेला दिसत नाही. एका अर्थाने आघाडीच्या काहीच मनासारखे होताना दिसत नाही. अशातच आता आणखी एक धक्का त्यांना पचवावा लागणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली महाराष्ट्र सरकारची पुनर्विविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

काय होती याचिका?

मार्च 2020 मध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असून सध्या ते जेलमध्ये आहेत. अशात परमबीर सिंह यांच्यावर नोंदवलेली सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवली होती, ज्याच्या विरोधात तत्कालीन उद्धव सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली महाराष्ट्र सरकारची पुनर्विविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Shivsena vs Shinde : तारीख पे तारीख, शिवसेना-शिंदे गटाच्या वादावर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला!

ठाकरे सरकारकडून निलंबनाची कारवाई

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं. “बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे,” असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सहा महिने अज्ञातवासात

खंडणीच्या गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सुमारे सहा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अखेर मुंबईत पोलिसांपुढे शरण आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना 6 डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंह यांनी आपण चंदिगडमध्येच असल्याचं सांगितलं होतं. तसंच लवकरच मुंबईत तपास यंत्रणांपुढे हजर होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते विमानतळावरून थेट कांदिवली येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात सकाळी 11 च्या सुमारास हजर झाले होते.

First published: