Home /News /national /

सुपरटेकच्या 40 मजली दोन्ही इमारती पाडण्याचा SCचा आदेश; खरेदीदारांच्या पैशाचं काय होणार?

सुपरटेकच्या 40 मजली दोन्ही इमारती पाडण्याचा SCचा आदेश; खरेदीदारांच्या पैशाचं काय होणार?

प्रत्येकी चाळीस मजले असणाऱ्या सुपरटेकच्या या इमारतीत दोन हजार फ्लॅट्स आहेत.

प्रत्येकी चाळीस मजले असणाऱ्या सुपरटेकच्या या इमारतीत दोन हजार फ्लॅट्स आहेत.

सुपरटेक एमेराल्ड प्रकरणात (Supertech emerald) सर्वोच्च न्यायालयान मोठा निर्णय (Supreme Court Verdict) दिला आहे. सुपरटेकच्या संबंधित दोन्ही ट्विन इमारती पाडण्याचा आदेश कोर्टाकडून देण्यात (SC ordered to demolition of both twin buildings) आला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 31 ऑगस्ट: सुपरटेक एमेराल्ड प्रकरणात (Supertech emerald) सर्वोच्च न्यायालयान मोठा निर्णय (Supreme Court Verdict) दिला आहे. सुपरटेकच्या संबंधित दोन्ही ट्विन इमारती पाडण्याचा आदेश कोर्टाकडून देण्यात (SC ordered to demolition of both twin buildings) आला आहे. या दोन्ही इमारती प्रत्येकी 40 मजली आहेत. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं की, या इमारती नोएडा प्राधिकरण आणि सुपरटेकनं संगनमत करत बेकायदेशीरपणे बांधल्या आहेत. त्यामुळे संबंधित दोन्ही इमारतींवर हातोडा चालवण्याचा आदेश कोर्टाकडून दिला आहे. तसेच सुपरटेकनं स्वतःच्या पैशानं या इमारती तीन महिन्यांच्या आत पाडावी आणि खरेदीदारांची व्याजासह रक्कम परत करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 2014 मध्ये, अलाहाबाद उच्च न्यायालयानं या इमारती पाडण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी सुपरटेकनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण याठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. हेही वाचा-द्रविडच्या 'इंदिरानगर'मध्ये भीषण अपघात; ऑडी कारही नाही वाचवू शकली 7 जणांचे प्राण प्रत्येकी चाळीस मजले असणाऱ्या सुपरटेकच्या या इमारतीत दोन हजार फ्लॅट्स आहेत. पण नियमांचं उल्लंघन करत या इमारती बांधण्याची परवानगी देण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. कोर्टानं म्हटले की, ज्यांनी या सुपरटेक ट्विन टॉवर्समध्ये फ्लॅट खरेदी केले होते. त्या सर्वांना वार्षिक 12 टक्के व्याजासह रक्कम परत केली जावी. तसेच इमारती पाडत असताना, इतर इमारतींचं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम आर शाह यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली आहे. हेही वाचा-सोनं तस्करीसाठी तरुणाची अनोखी शक्कल; जीन्सचा कलर पाहून पोलिसही हैराण सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, या इमारती बिल्डर आणि नोएडा प्राधिकरणानं संगनमत करत बेकायदेशीरपणे उभारले आहेत. या इमारतीच्या मंजुरीची माहिती RWA ला देखील माहीत नव्हती. सुपरटेकनं टी 16 आणि टी 17 इमारत उभारण्यापूर्वी फ्लॅट मालक आणि आरडब्ल्यूएची मंजुरी घेणं आवश्यक होतं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तसेच दोन्ही इमारतीमधील किमान अंतर ठेवण्याच्या नियमाचं देखील उल्लंघन करण्यात आलं होतं. याबाबत नोटीस बजावल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या इमारत निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचार झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Supreme court

    पुढील बातम्या