S M L

सज्ञान मुलामुलीच्या आंतरजातीय विवाहावर 'खाप'चे निर्बंध बेकायदेशीर-सुप्रीम कोर्ट

तसंच खाप पंचायतींना बंदी घालण्याच्या दृष्टीने जर पाऊलं उचलली गेली नाहीत तर कोर्ट हस्तक्षेप करेल अशा भाषेत न्यायालयाने केंद्राला खडसावलं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 16, 2018 03:15 PM IST

सज्ञान मुलामुलीच्या आंतरजातीय विवाहावर 'खाप'चे निर्बंध बेकायदेशीर-सुप्रीम कोर्ट

16 जानेवारी: सज्ञान मुलामुलींनी जर सहसंंमतीने आंतरजातीय विवाह केला तर त्यावर कोणीच  आक्षेप  घेऊ शकत नाही असा निर्वाळा आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. खाप विषयी काही तरी करा असं म्हणत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला धारेवरही धरलं.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या व्यक्तींना खाप पंचायतच  काय  तर कुठलीच संस्था , जात पंचायत,  अथवा व्यक्ती प्रश्न विचारू शकत नाही  , छळू शकत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे. खापकडून  आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना त्रास दिला जातो काही प्रकरणी तर त्यांची हत्याही होते. या गोष्टींना आळा घालण्यासाठी काय करावं यासाठी एका न्यायमित्राची नियुक्ती सुप्रीम कोर्टाने केली होती. त्यानी यासाठी दिलेल्या सुचनांचा  केंद्र सरकारने विचार करावा असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे.तसंच खाप पंचायतींना बंदी घालण्याच्या दृष्टीने  जर पाऊलं उचलली गेली नाहीत तर कोर्ट हस्तक्षेप करेल अशा भाषेत न्यायालयाने केंद्राला खडसावलं आहे.

आता तरी सरकार  खाप पंचायतीविरोधात कायदे करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2018 03:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close