फुटणार की विझणार? फटाके बंदीवर सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय

फुटणार की विझणार? फटाके बंदीवर सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय

दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांबाबत सुप्रीम कोर्ट कुठला निर्णय देतं याकडे सगळ्या देशाचं लक्षं लागलंय.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.23 ऑक्टोबर : सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयावर तुमचं दिवाळीच सेलिब्रेशन अवलंबून राहणार आहे. कारण फटाक्याचं उत्पादन, वापर, विक्री आणि वितरणावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. फटाक्यांमुळं होणाऱ्या प्रदुषणाविरोधात 2015 मध्ये तीन शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांमार्फेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्ट आपला निर्णय देणार आहे.

फटाक्यांमुळं हवेचं प्रचंड प्रदुषण होतं. आवाजाची पातळीही धोक्या बाहेर वाढते. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळं फटाक्यांच्या उत्पादानावर आणि विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

यावर सुप्रीम कोर्टानं प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि अभ्यास करणाऱ्या इतर काही तज्ज्ञ संघटनांकडून फटाक्यांवर त्यांची मतं मागितली होती. तीही उद्या कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

फटाक्यांवर बंदी आणण्याला उत्पादक संघटनांनी विरोध केलाय. फटाका उद्योगावर हजारो कामगारांचं घर चालतं त्यामुळं त्यावर बंदी आणू नये अशी त्यांची मागणी आहे.

दिवाळीला आता फक्त काही दिवस राहिले आहे. कोट्यवधी रूपयांच्या फटाक्यांचं उत्पादन झालं असून त्यांचं वितरणही होत आहे. सण आणि उत्सवांवर येत असलेल्या निर्बंधांमुळं आधीच न्यायालयांवर टीकाही होत आहे. त्यामुळं दिवाळीच्या तोंडावर सुप्रीम कोर्ट कुठला निर्णय देतं याकडे सगळ्या देशाचं लक्षं लागलंय.

पुणे: फिल्मी स्टाईलने जेलमधून पळाले 2 कैदी, जेल ब्रेकचा LIVE व्हिडिओ

First published: October 23, 2018, 7:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading