Home /News /national /

Bullock cart race in Maharashtra: महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार, सुप्रीम कोर्टाकडून शर्यतीला सशर्त परवानगी

Bullock cart race in Maharashtra: महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार, सुप्रीम कोर्टाकडून शर्यतीला सशर्त परवानगी

Bullock cart race in Maharashtra: राज्यातील बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर : बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. बैलगाडा शर्यतवर (Bullock cart race) असलेली बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यात आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि सात वर्षांनंतर आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, बैलगाडा शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे शेतकरी नाराज झाले होते ही बंदी उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर आज बैलगाडा शर्यतीला परवानी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निश्चितच सर्वांना आनंद झाला आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की, ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवनागी दिली आहे त्यानुसार सर्वांनी नियमांचे पालन करुनच शर्यतीचं आयोजन करावं. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, माझ्या कानावर अजूनही विश्वास बसत नाहीये. आनंदाची गोष्ट आहे. गेल्या 7 वर्षांपासून आतुरतेने वाट पहात होतो. मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे विशेष आभार. शेतकऱ्याच्या जीवनात आनंद देणारी ही घटना आहे. काल 2 तास चांगले आर्ग्युमेंट झाले, राज्य शासनाची चांगली बाजू मांडली. कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये चालू असताना आपल्याकडे का नाही? या मुद्द्यावर चर्चा झाली, सुप्रीम कोर्टाने चांगला निर्णय दिलाय. राज्यातील बैलगाडा शर्यतीला एक प्राचीन परंपरा लाभली आहे. बैलगाडा शर्यत हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी जोर धर होती. तर दुसरीकडे प्राणीप्रेमी मात्र, या बैलगाडा शर्यतीला विरोध करत आहेत. वाचा : उद्धव ठाकरेंनी गद्दारांना दाखवला बाहेरचा रस्ता, रामदास कदम यांना मोठा धक्का काय आहे प्रकरण? राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली. महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या संदर्भात 2017 मध्ये एक कायदा संमत केला होता. मात्र, त्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने या आदेशाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचितका दाखल केली होती. भारतातील इतर राज्यांत बैलगाडा शर्यत सुरू भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडा शर्यती सुरू आहेत. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हाव्यात ही मागणी होत होती.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra, Supreme court

    पुढील बातम्या