हार्दिक पटेल यांना न्यायालयाचा मोठा धक्का! निवडणूक लढता येणार नाही?

हार्दिक पटेल यांना न्यायालयाचा मोठा धक्का! निवडणूक लढता येणार नाही?

हार्दिक पटेल यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

सुरत, 02 एप्रिल : पाटीदार समजाचे नेते आणि काँग्रेसचे जामनगरमधील उमेदवार हार्दिक पटेल यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. पाटीदार समाजाच्या आंदोलनादरम्यान जमावाला भडकवण्याच्या आरोपाखाली गुजरात उच्च न्यायालयानं हार्दिक पटेल यांन न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला हार्दिक पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देत तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं हार्दिक पटेल यांची ही मागणी फेटाळून लावली आहे.

त्यामुळे आता हार्दिक पटेल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही ? यावर देखील आता शंका निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 04 एप्रिल आहे. 2018मध्ये हार्दिक पटेल यांना न्यायालयानं दोषी ठरवत 2 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, यामध्ये भाजपचे नेते देखील सहभागी होते. मग, मलाच वेगळा न्याय का? असा सवाल हार्दिक पटेल यांनी केला आहे. भाजपपुढे झुकलो नाही हाच माझा दोष. पण, यामुळे खचून न जाता काँग्रेसच्या समर्थनार्थ केवळ गुजरातमध्ये नाही तर संपूर्ण देशात प्रचार करून भाजपला आव्हान देणार असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.

SPECIAL REPORT: विकासाची गाडी पुन्हा हिंदुत्वाच्या रुळावर

First published: April 2, 2019, 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading