'चौकीदार चौर हैं'बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी अडचणीत? सुप्रीम कोर्टाकडून नोटीस

'चौकीदार चौर हैं'बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी अडचणीत? सुप्रीम कोर्टाकडून नोटीस

सुप्रीम कोर्टाने राफेलच्या कागदपत्रांवर निर्णय दिल्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या टिप्पणीविरोधात भाजपने याचिका दाखल केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाबाबत केलेल्या दाव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.

'आता सुप्रीम कोर्टदेखील म्हणत आहे की, चौकीदार चोर हैं', या राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर कोर्टात आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवत 22 एप्रिलपर्यंत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्टाने राफेलच्या कागदपत्रांवर निर्णय दिल्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या टिप्पणीविरोधात भाजपने याचिका दाखल केली. चौकीदार चोर है, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. मोदी हे चोर आहेत आणि त्यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी दिले, अशी टिप्पणीही राहुल गांधींनी केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्याला भाजपने जोरदार आक्षेप घेतला.

राहुल गांधींचं हे वक्तव्य खोटं आणि बदनामीकारक आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाकडे भाजपने ही याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी हे नरेंद्र मोदींवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. याबदद्ल आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाची नाराजी व्यक्त केली आहे, असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटलं आणि त्यांनी ही याचिका दाखल केली.

VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग

First published: April 15, 2019, 12:45 PM IST

ताज्या बातम्या