नवी दिल्ली, 5 एप्रिल : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियानं आता 1 मेपासून कर्जचा दर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 1 लाखांच्यावर कर्ज स्वस्त होणार आहे. तसेच, 1 मेपासून SBIच्या ठेवीच्या रखमेतही घट करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सामन्य नागरिकांना एक लाखांच्यावर कर्ज घेण्याकरिता जास्त आटापीटा करावा लागणार नाही.
रिझर्व बँकेच्या बाह्य मापदंड (एक्सटर्नल बेंचमार्किंग) नियमानुसार ठेवीच्या आणि कर्जाच्या दरात कपात करणारी SBI भारतातील पहिली बॅंक ठरली आहे. याआधी रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या आर्थिक वर्षातील पतधोरण जाहीर करण्यात आलं. या पतधोरणात 0.25 पॉईंटची कपात करण्यात आलीय. त्यामुळे आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आलाय. बँकांनी रेपो रेटमधील कपातीचा फायदा सर्वसामान्य कर्जदारांना दिल्यास हफ्ता कमी होऊ शकतो. या निर्णयामुळे सर्वसामान्यांचं ईएमआय आता कमी होईल. RBIचे नवे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या कार्यकाळातली ही दुसरी रिव्ह्यू मीटिंग आहे. त्यामुळे आता SBIच्या या निर्णयामुळं कर्जदारांना मोठा दिलासा मिळू शकतो.
कोणाला होणार फायदा ?
SBIने केलेल्या घोषणेनुसार, रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार बदलेल्या दरांचा फायदा ग्राहकांना लगेच देण्याच्या उद्देशाने बचत ठेवी आणि कमी कालावधीकरिता घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला रेपो रेटशी संलग्न करण्याचा निर्णय मे 2019पासून लागू करण्यात येणार आहे. पण याचा फायदा SBIच्या सर्व ग्राहकांना होणार नाही. हा नियम फक्त त्या खातेदारांना लागू होणार आहे, ज्यांच्या खात्यात एक लाखाहून अधिक रक्कम आहे.
सैराट ते कागर, मेकओव्हरनंतरची 'आर्ची'ची पहिली UNCUT मुलाखत