S M L

बेळगावच्या डाॅ. सवितामुळे आयर्लंडमध्ये गर्भपाताला परवानगी

लग्नानंतर ती आयर्लंड देशात स्थायिक झाली आणि सुखाचा संसार सुरू असतानाच आयर्लंडमधल्या एका कायद्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला.

Sonali Deshpande | Updated On: May 28, 2018 02:51 PM IST

बेळगावच्या डाॅ. सवितामुळे आयर्लंडमध्ये गर्भपाताला परवानगी

संदीप राजगोळकर, बेळगाव, 28 मे : ती मूळची बेळगावची. लग्नानंतर ती आयर्लंड देशात स्थायिक झाली आणि सुखाचा संसार सुरू असतानाच आयर्लंडमधल्या एका कायद्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. मात्र त्याच आयर्लंड देशात एक चळवळ उभी राहिली आणि तब्बल 155 वर्षांचा जुना कायदा बदलावा लागला.

डॉ. सविता हलपन्नावर.  बेळगाव शहरातल्या श्रीनगर भागात राहणारी ही तरुणी. लहानपणापासून डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं.त्याप्रमाणं तिनं बेळगावच्या केएलई महाविद्यालयातून बीडीएसचं शिक्षण घेतलं आणि ती डॉक्टर झाली. मग 2010 साली तिचं लग्न झालं, इंजिनीअर असलेल्या प्रवीण यांच्याशी.

मग ती आयर्लंड देशामध्ये स्थायिक झाली. काही दिवसांनी सविता गर्भवती राहिली. त्यातच तिला पाठीच्या मणक्याचा त्रास सुरू झाला. मग तिला गर्भपात करायचा होता. वैद्यकीय अहवालानुसार तिला गर्भपात करणं गरजेचं होतं. म्हणून तिनं आयर्लंडमधल्या डॉक्टरांकडे गर्भपाताची मागणी केली. पण तिथल्या कायद्यानुसार गर्भपात करणं गुन्हा होता. म्हणून तिला गर्भपात करता आला नाही आणि याच आजारपणामध्ये 28 ऑक्टोबर 2012ला सविताचा मृत्यू झाला.

सविताच्या मृत्यूनंतर आयरिश जनता रस्त्यावर उतरली. तसंच इतर देशांमध्येही याबाबत निदर्शनं झाली. मग गेल्या 25 तारखेला आयर्लंडमध्ये गर्भपात करावा की नको याबाबत मतदान घेण्यात आलं. त्यामध्ये 66 टक्के नागरिकांनी हा कायदा रद्द करावा असं मतदान केलं. त्यानंतर आता नव्या कायद्यानुसार 12 आठवड्यांपर्यंतचा गर्भ काढून टाकण्याची मुभा आयरिश महिलांना असणाराय.

विशेष म्हणजे यापूर्वी कोणत्याही आयरिश महिलेनं गर्भपात केल्यास तिला 14 वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती, तर 2016 सालामध्ये तब्बल 3 हजार महिलांनी युकेमध्ये जाऊन गर्भपात केला होता. आज जरी सविता आपल्यात नसली तरी तिच्या जाण्यानं आयरिश महिलांना जगण्याची एक नवी उमेद मिळाली, हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2018 12:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close