मराठी बातम्या /बातम्या /देश /मला माझ्या बायकोपासून वाचवा..! पीडित व्यक्तीची कहाणी ऐकून चक्रावले महिला पोलीसही

मला माझ्या बायकोपासून वाचवा..! पीडित व्यक्तीची कहाणी ऐकून चक्रावले महिला पोलीसही

महिला पोलीस ठाण्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक माणूस आपल्या पत्नीपासून स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांकडे विनंती करण्यासाठी आला होता.

महिला पोलीस ठाण्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक माणूस आपल्या पत्नीपासून स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांकडे विनंती करण्यासाठी आला होता.

महिला पोलीस ठाण्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक माणूस आपल्या पत्नीपासून स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांकडे विनंती करण्यासाठी आला होता.

पाटणा, 01 जानेवारी: बिहारची (Bihar) राजधानी पाटणा (Patna) येथील महिला पोलीस ठाण्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक माणूस आपल्या पत्नीपासून स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांकडे विनंती करण्यासाठी आला होता. त्या व्यक्तीची तक्रार ऐकून प्रथम महिला पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस चक्रावून गेले. त्यानंतर त्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेण्यात आले.

आता महिला पोलीस स्टेशन प्रभारींनी पती-पत्नीला 28 जानेवारीला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावलं आहे. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याला नशीला पदार्थ खाल्ल्याला देऊन लग्न केले. त्याच अवस्थेत नोटरीवर सह्या घेतल्या. या मुलीसोबत राहण्याची इच्छा नसल्याचं व्यक्तीनं तक्रारीत म्हटलं आहे. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती महिला आत्महत्या करण्याची धमकी देण्यास सुरुवात करते.

हेही वाचा- Co-WIN वर लहान मुलांच्या लसीकरणाची नोंदणी Live, अशी आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कथित पत्नी, पीडित पती, पटनाच्या अनिसाबाद भागातील रहिवासी आहे. पतीनं पोलिसांना सांगितलं की, त्याच्या लग्नाची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली तेव्हा त्यांनी त्याला घराबाहेर हाकलून दिले. आता ती व्यक्ती हे लग्न टिकवायला तयार नाही. त्याला या नातेसंबंधातून मुक्त व्हायचं आहे. महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी कुमारी सहचारी यांनी तरुण आणि तरुणीची बाजू ऐकून घेत पती-पत्नीला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले.

दोघांची पूर्वीपासून ओळख

दोघेही एकाच परिसरात राहत असल्याचे पीडित व्यक्तीनं पोलिसांना सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये ओळख झाली होती. तरुण 7 महिन्यांपासून तरुणीला ओळखत होता. दोघांमध्ये मैत्री झाली त्यानंतर दोघं फोनवर बोलण्याबरोबरच एकमेकांना भेटू लागले. एकदा कशावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

त्या व्यक्तीनं सांगितले की, त्याने मुलीचे फोन घेणे बंद केले. तिला व्हॉट्सअॅपवर ब्लॉकही करण्यात आले. यावर तरुणीने काही न बोलल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे या तरुणाचं म्हणणं आहे. या व्यक्तीने सांगितले की, यावर्षी एप्रिल महिन्यात मुलीच्या कुटुंबीयांनी तिला घरी बोलावले होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी अंमली पदार्थ देऊन नोटरीवर सही करून लग्न करून दिल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. यानंतर तरुणाला त्याच्या नातेवाईकांनी घराबाहेर हाकलून दिलं. आता हा पीडित व्यक्ती न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आला आहे.

हेही वाचा-  वैष्णोदेवी मंदिर चेंगराचेंगरी:  मृत 12 भाविक 'या' चार राज्यातील

तरुणाच्या तक्रारीवरून तरुणीच्या कुटुंबियांनाही पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. मुलीच्या कुटुंबीयांनी तीन लाख रुपये रोख आणि दुचाकी देण्याचं सांगितलं. तसेच लग्न न मोडण्याची विनंती केली. दुसरीकडे, मुलगा म्हणतो की त्याला मुलगी आवडत नाही, त्यामुळे तो हे नाते टिकवू शकत नाही. यावर महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी 28 जानेवारीला पुन्हा दोघांकडच्या कुटुंबियांना बोलावलं आहे.

First published:

Tags: Bihar, Wife and husband