Save Aarey प्रमाणेच झाडं वाचवण्यासाठी या 5 आंदोलनांत लोकांनी पणाला लावले होते जीव

मुंबई मेट्रो -3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतली झाडं तोडण्याच्या विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. झाडं वाचवण्यासाठी केलेलं हे देशातलं पहिलंच आंदोलन नाही. देशभरात पर्यावरण रक्षणासाठी आतापर्यंत अशी लोकांची उत्स्फूर्त आंदोलनं झाली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 07:49 PM IST

Save Aarey प्रमाणेच झाडं वाचवण्यासाठी या 5 आंदोलनांत लोकांनी पणाला लावले होते जीव

मुंबई, 5 ऑक्टोबर : मुंबई मेट्रो -3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतली झाडं तोडण्याच्या विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. झाडं वाचवण्यासाठी केलेलं हे देशातलं पहिलंच आंदोलन नाही. देशभरात पर्यावरण रक्षणासाठी आतापर्यंत अशी लोकांची उत्स्फूर्त आंदोलनं झाली आहेत. बघुया त्याबदद्ल.

1. बिष्णोई आंदोलन

1730 मधल्या बिष्णोई आंदोलनाचीही अशीच कथा आहे. जोधपूरचे महाराजा अभय सिंह यांना नवा महाल बांधायचा होता. यासाठी चांगल्या दर्जाचं लाकूड हवं होतं. याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी सैनिकांना पाठवलं. हे सैनिक बिष्णोईंच्या खेजरी गावात पोहोतले. गावातल्याच एक रहिवासी अमृता देवी यांना याची चाहूल लागली तेव्हा त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. त्यांनी झाडाला मिठी मारून आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्यांना पाहून त्यांच्या मुलींनीही झाडांना अलिंगन दिलं. ही बातमी जेव्हा गावात पसरली तेव्हा बिष्णोई समाजातल्या लोकांनी आंदोलन सुरू केलं. 363 गावकऱ्यांनी यात आपले प्राण दिले. बिष्णोई समाजातले लोक झाडांची मोठ्या श्रद्धेने पूजा करतात. यानंतर 1972 मध्ये सुरू झालेल्या चिपको आंदोलनामागे हीच प्रेरणा होती.

2.चिपको आंदोलन

झाडं वाचवण्यासाठीच्या या आंदोलनाची सुरुवात उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यात गोपेश्वरमध्ये झाली. चंडीप्रसाद भट, गौरा देवी आणि सुंदरलाल बहुगुणा या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी 1973 मध्ये या आंदोलनाला सुरुवात केली. जंगलाची अनिर्बंध कत्तल आणि बेकायदेशीर वृक्षतोडीच्या विरोधात हे आंदोलन होतं.

Loading...

झाडं वाचवण्यासाठी साधेसुधे गावकरी झाडांना घट्ट मिठी मारून आंदोलन करत होते. म्हणूनच याला म्हणतात 'चिपको आंदोलन'. हे आंदोलक कार्यकर्ते कंत्राटदारांना झाडं तोडू देत नव्हते. या विरोधामुळे तत्कालीन मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी एक समिती स्थापन केली. या समितीने गावकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. 1980 मध्ये या आंदोलकांचा विजय झाला आणि इंदिरा गांधींच्या सरकारने हिमालयाच्या वनक्षेत्रातली झाडं तोडण्यावर 15 वर्षं निर्बंध घातले.

(हेही वाचा : आरेमध्ये झाडांची कत्तल पण काय म्हणाले केंद्रीय पर्यावरण मंत्री?)

3. सायलेंट व्हॅलीचा लढा

सायलेंट व्हॅली हे केरळमधलं हे वर्षावन 89 चौकिमी भागात पसरलेलं आहे. या जंगलात वैशिष्ट्यपूर्ण वनसंपदा आहे. 1973 मध्ये केरळच्या विद्युत महामंडळाने इथे एका जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली. कुंतिपुजा नावाच्या नदीवर धरण बांधून जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार होता. त्यामुळे या जंगालाचा काही भाग पाण्याखाली जाणार होता. हे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांचं आंदोलन उभं राहिलं. 1981 मध्ये या आंदोलनापुढे इंदिरा गांधी सरकारला झुकावं लागलं. सायलेंट व्हॅली ला संरक्षित वनक्षेत्र घोषित करण्यात आलं. 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कची घोषणा केली.

4. एप्पिको आंदोलन

कर्नाटकात उत्तर कन्नड आणि शिमोगा जिल्ह्यात जंगल वाचवण्यासाठी 1983 मध्ये आंदोलन सुरू झालं. वनांच्या सुरक्षेसाठी पांडुरंग हेगडेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडलं गेलं. स्थानिक लोक झाडं तोडणाऱ्या कंत्राटदारांच्या विरोधात पेटून उठले. त्यांनी मोर्चे काढले, नुक्कड नाटकं सादर केली. सलग 38 दिवस हे आंदोलन सुरू होतं. या तीव्र निदर्शनांमुळे झाडं तोडणारे मजूरही झाडं तोडण्याचं काम थांबवून निघून गेले. शेवटी लोकांचा विजय झाला.

(हेही वाचा : #AareyForest: झाडांच्या कत्तलीनंतर 'आरे' परिसरात कलम 144 लागू!)

5.'जंगल बचाओ' आंदोलन

'जंगल बचाओ' आंदोलनाची सुरुवात 1982 मध्ये बिहारच्या सिंहभूम जिल्ह्यात झाली. नंतर हे आंदोलन झारखंड आणि ओडिशामध्ये पसरलं. सरकारचा बिहारमधलं सागाचं जंगल नष्ट करण्याचा डाव होता. पण इथले आदिवासी एकवटले आणि जंगल वाचवण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं.

=====================================================================================================

'इस्त्रो'च्या सिवन यांचं विमानात टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...