मराठी बातम्या /बातम्या /देश /

'आम्ही ऐकलंय की राहुल गांधी समलैंगिक आहेत'

'आम्ही ऐकलंय की राहुल गांधी समलैंगिक आहेत'

New Delhi: Congress President Rahul Gandhi at the party HQ on the 134th Congress Foundation Day, in New Delhi, Friday, Dec. 28, 2018. (PTI Photo/Ravi Choudhary) (PTI12_28_2018_000044B)

New Delhi: Congress President Rahul Gandhi at the party HQ on the 134th Congress Foundation Day, in New Delhi, Friday, Dec. 28, 2018. (PTI Photo/Ravi Choudhary) (PTI12_28_2018_000044B)

'सावरकरांवर काँग्रेसने अतिशय घाणेरडा आरोप केलाय. त्यांच्या अकलेचे दिवळे निघाले आहे.'

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 03 जानेवारी : काँग्रेसने सावकरांवर जे वादग्रस्त पुस्तक वितरीत केलंय त्यावरून देशभर वादळ निर्माण झालाय. भाजपने हा मुद्दा लावून धरला असून त्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्रात शिवसेनेचा मित्रपक्ष काँग्रेस असल्याने आता भाजप सेनेची कोंडी करण्याचाही प्रयत्न करतेय. मध्य प्रदेशात काँग्रेसने एका कार्यक्रमात सावरकरांबद्दल अतिशय आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तिका वितरीत केली होती. त्यानंतर हिंदूमहासभेच्या अध्यक्षांनी

काँग्रेस सेवादलद्वारा (Congress Seva Dal) मध्य प्रदेशात एका वादग्रस्त पुस्तिकेचे (booklet)वितरण करण्यात आले होते. या पुस्तिकेवरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथ्थूराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचा दावा या पुस्तिकेत करण्यात आला आहे. यावरून भाजपसह शिवसेनेनेही काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

आता या वादाला वेगळं वळण मिळालंय. अखिल भारतीय हिंदू महासेभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी यावरून थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शरसंधान केलंय. ते म्हणाले, सावरकरांवर काँग्रेसने अतिशय घाणेरडा आरोप केलाय. आम्ही पण असं ऐकतोय की काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे समलैंगिक आहेत म्हणून. चक्रपाणी यांच्या या टीकेने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अतिशय घाणेरडे लिखाण असलेली पुस्तिका काँग्रेस पक्षाने वितरित करून आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवले असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही त्या पक्षाची बौद्धिक आणि मानसिक दिवाळखोरी आहे. या अशा दिवाळखोर पक्षाशी अनैसर्गिक आघाडी केलेली शिवसेना तीव्र निषेध नोंदवून या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालणार, की केवळ सत्तेसाठी आपल्या आराध्यांचे असे अपमान वारंवार सहन करणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्ष या पुस्तकाचा तीव्र निषेध करते. हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर पहिली प्रतिक्रिया त्यांनीच आपल्या खास शैलीत दिली असती. मात्र, आज तशी अपेक्षा करता येत नसली तरी या पुस्तकावर तत्काळ बंदीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

असे आहेत ठाकरे सरकारचे संभाव्य पालकमंत्री, थोड्याच वेळात होणार घोषणा

संजय राऊत यांनी ठणकावलं

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले,भोपाळमधले काँग्रेसचे गोपाळराव कोण आहेत माहीत नाही. पण शिवसेनेने अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे तरीही आपण वारंवार का विचारता? वीर सावरकर आमच्यासाठी महान होते आहेत आणि राहतील त्यांच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होणार नाही, भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही. ते पुस्तक अनधिकृत आहे, त्यावर बंदी आहे. अशी पुस्तके तरीही वाटली जातात, भाजपच्या नेत्यांविषयीही वाटली गेली आहे. सावकरांविषयी कोणीही आम्हाला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असे संजय राऊत यांनी ठणकावले आहे.

First published: