भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला सौदी अरेबियाचा पाठिंबा

भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला सौदी अरेबियाचा पाठिंबा

सौदी अरेबिया हा भारताचा मित्र असून या लढ्यात गुप्त माहितीसह सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन सलमान यांनी दिलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : भारत दौऱ्यावर आलेले सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बीन सलमान यांचं बुधवारी राष्ट्रपती भवनात शाही स्वागत करण्यात आलं. नंतर झालेल्या व्दिपक्षीय चर्चेत सलमान यांनी भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. सलमान हे नुकचेच पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाऊन आलेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय.

युवराज सलमान यांचं मंगळवारी रात्री भरातात आगमन झालं होतं. पंतप्रधा नरेंद्र मोदी राजशिष्टाचार बाजूला ठेवून सलमान यांचं स्वागत करायला विमानतळावर गेले होते. आज सकाळी राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यानंतर हैदराबाद हाऊस इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सलमान यांच्यात शिष्टमंडळासोबत विविध विषयांवर चर्चा झाली.

त्यानंतर दोनही देशांदरम्यान ऊर्जा, संरक्षण, पर्यटन,विज्ञान-तंत्रज्ञान आणि व्यापार या विषयांवर सहकार्याचे करार करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि युवराज सलमान यांनी संयुक्त निवेदनही दिलं. पंतप्रधान मोदी यांनी पुलमावा हल्ल्याचा स्पष्टपणे उल्लेख करत दहशतवादाला पाठिंबा देण्याऱ्या देशांवर जागतिक दबाव वाढविण्याचं आवाहन केलं.

तर युवराज सलमान यांनी दहशतवादविरोधी लढ्याच्या भराताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. सौदी अरेबिया हा भारताचा मित्र असून या लढ्यात गुप्त माहितीसह  सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन सलमान यांनी दिलं. कट्टरता आणि दहशतवाद ही दोनही देशांसाठी चिंतेची बाब आणि आव्हान आहे असंही सलमान यांनी सांगितलं.

EXCLUSIVE VIDEO: ठाण्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद; असं पकडलं शिताफीनं

First published: February 20, 2019, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading