धक्कादायक! Air Strikeनंतरही बालाकोटमधील 'जैश'चा मदरसा जैसे थेच, सॅटेलाईट फोटो समोर

धक्कादायक! Air Strikeनंतरही बालाकोटमधील 'जैश'चा मदरसा जैसे थेच, सॅटेलाईट फोटो समोर

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मार्च : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आपली मोहीम तीव्र स्वरूपात राबवण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, 26 फेब्रुवारीला भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईमध्ये  बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदची तळ उद्धवस्त केल्याचा दावा केला. पण, ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला होता, तेथील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशाची इमारत जशीच्या तशी दिसत आहे. यासंदर्भातील नवीन सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रॉयटर्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमधील एका खासगी सॅटलाइटद्वारे हा फोटो 4 मार्चला घेण्यात आला आहे. या फोटोंमध्ये जैश-ए-मोहम्मदचे सहा मदरसे आजही बालकोटमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक केल्याच्या सहा दिवसांनंतर हे फोटो जारी करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला होता तेथील स्पष्ट चित्र दिसणारे फोटो आतापर्यंत सार्वजनिकरित्या जारी करण्यात आली नव्हती. पण प्लॅनेट लॅब्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोंमध्ये बालाकोट परिसर स्पष्ट दिसत आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार,बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशांचे कोणत्याही प्रकार नुकसान झालेले नाही, हे सॅटेलाईट फोटोंमध्ये दिसत आहे. शिवाय, मदरशांच्या इमारतींशेजारी झाडेझुडपे देखील दिसत आहेत.

काय आहे नेमकी घटना?

भारतीय वायुदलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून 26 फेब्रुवारीला पहाटे 3. 20 वाजण्याच्या सुमारास जैश-ए-मोहम्मदच्या तळांना लक्ष्य केलं. जवळपास 21 मिनिटं बॉम्ब वर्षाव सुरू होता. या धाडसी कारवाईमध्ये 12 मिराज -2000 विमानांनी सहभाग घेतला होता.या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शिवाय, 200 ते 300 दहशतवादी ठार झाले. यामध्ये 25 कमांडरचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी! चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला, अन्...

First published: March 6, 2019, 11:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading