उदयराजेंनी वाढवली राष्ट्रवादीची चिंता, गडकरींच केलं तोंडभरून कौतुक!

उदयराजेंनी वाढवली राष्ट्रवादीची चिंता, गडकरींच केलं तोंडभरून कौतुक!

'गडकरी जे बोलतात तेच करतात, लोक त्यांना त्यांच्या कामाची पावती देतील'

  • Share this:

सातारा, 23 डिसेंबर :  साताऱ्याचे राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले आपल्या वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. रविवारी साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात उदयनराजेंनी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. उदयनराजेंच्या या कौतुकामुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले आणि भाजपमधली वाढती जवळीक चर्चेच विषय ठरली आहे.

साताऱ्यात आज खंबाटकी घाटातील तीन मार्गिकेच्या बोगद्याच्या कोनशिला अनावरण समारंभ पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयराजे भोसले उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे इच्छाशक्ती आहे. ते जे बोलतात तेच करून दाखवतात त्यामुळे लोक त्यांना त्याची पावती देतील. उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. शरद पवारांवरही अनेक वेळा टीका केलीय तसेच ते भाजपच्या वाटेवर असल्याचीही चर्चा आहे.

साताऱ्यातल्या अंतर्गत राजकारणामुळेही उदयनराजे नाराज आहेत.

राष्ट्रवादीचं आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणी रस्त्यावर कांदे टाकत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदेंनी आक्रमक आंदोलन केलं.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली असून कांद्याला चांगला दर मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. तसंच कांद्याला दिलेलं 200 रुपयांचं अनुदान मान्य नाही, असं म्हणत यासाठी वाढीव मदतीची मागणी राष्ट्रवादीच्या या आंदोलनात करण्यात आली.

 

 

First published: December 23, 2018, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading