'सारथी'चा घोळ: स्कॉलरशिप रखडली, 300 मराठा विद्यार्थ्यांना दिल्लीतून राज्यात परतावं लागणार

'सारथी'चा घोळ: स्कॉलरशिप रखडली, 300 मराठा विद्यार्थ्यांना दिल्लीतून राज्यात परतावं लागणार

स्कॉलरशिपच मिळत नसल्यामुळे ग्रंथालयाची फी, मेस आणि खोलीचं भाडं देता येत नाही. त्यामुळे तातडीने या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न तातडीने सोडवावा असं मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय.

  • Share this:

नवी दिल्ली 17 फेब्रुवारी : स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी (UPSC) दिल्लीत महाराष्ट्रातले शेकडो विद्यार्थी येत असतात. 'सारथी'संस्थेच्या स्कॉलरशीपवर राज्यातून मराठा समाजाचे अनेक विद्यार्थी या परिक्षांची तयारी करत असतात. आत या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सरकारच्या सारथी या योजनेअंतर्गत मराठा समाजातील मुले दिल्लीत यूपीएससीचे क्लासेस करण्याकरिता आले होते. सारथी योजनेत सहभागी होण्याकरिता या विद्यार्थ्यांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना तेरा हजार रुपये स्कॉलरशिप महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिली जाते. मात्र गेल्या काही महिन्यापासून ही स्कॉलरशिप त्यांना मिळत नाही. त्यामुळे दिल्लीत राहणं त्यांना परवडणे शक्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आता दिल्लीतून राज्यात परताव लागणार आहे.

अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीत या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप अडकली आहे. पैसेच मिळत नसल्यामुळे या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आता दिल्लीतून परतायची वेळ आली आहे. त्यामुळे जवळपास 300 विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलनाचा इशारा दिलाय. आज सकाळी साडेअकरा वाजता हे सर्व विद्यार्थी राज्य सरकारच्या कारभाराविरोधात रस्त्यावर उतरून विरोध दर्शविणार आहेत.

स्कॉलरशिपच मिळत नसल्यामुळे ग्रंथालयाची फी, मेस आणि खोलीचं भाडं देता येत नाही. त्यामुळे तातडीने या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न तातडीने सोडवावा असं मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय. सारथीचा वाद राज्यातही गाजला होता. या संस्थेचे अनुदानच बंद करण्याचा निर्णय काही अधिकाऱ्यांनी घेतल्याचं पुढे आल्याने ही संस्था बंद होणार का असा प्रश्नही विचारला गेला. त्याविरोधात खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी उपषणही केलं होतं.

पाकिस्तानमध्ये न्यूक्लियर गॅस लीक होऊन 6 जणांचा मृत्यू, 100 जणांवर उपचार सुरू

सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी 11 जानेवारीला पुण्यातील सारथी संस्थेच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं होतं.'सारथी बचाव' अशी हाक देत मराठा समाजातील तरुणांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबाही दिला होता. महिनाभरात 22 पत्रके काढूनही मुख्य सचिव जे.पी. गुप्ता यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट 'सारथी'ला बदनाम करण्याचे काम केले, असा आरोप संभाजीराजे यांनी केला होता.

उद्धव ठाकरेंवरील नाराजीनंतर शरद पवारांनी मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक

गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे उद्घाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता, असे संभाजी राजे यांनी सांगितले आहे. अनेक दिवसांपासून मी याविषयी सर्व त्या स्तरावर पाठपुरावा करत आहे. पण निर्णय काही होताना दिसत नाही.  लोकशाही मार्गाने, शांतता पूर्वक कुठलाही कायदा हातात न घेता आम्ही हा लढा उभारणार आहोत असंही त्यांनी सांगितलं होतं.

First published: February 17, 2020, 9:17 AM IST
Tags:

ताज्या बातम्या