SBI PO Recruitment 2019: अर्ज करण्यासाठी उरलेत फक्त 7 दिवस, 'या' लिंकवर करा क्लिक

SBI PO Recruitment 2019: अर्ज करण्यासाठी उरलेत फक्त 7 दिवस, 'या' लिंकवर करा क्लिक

तुम्हाला बँकेत पीओची नोकरी हवी असेल, तर सरकारी बँकेत काम करण्यासाठी मोठी संधी आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : तुम्हाला बँकेत पीओची नोकरी हवी असेल, तर सरकारी बँकेत काम करण्यासाठी मोठी संधी आहे. स्टेट बँक आॅफ इंडियानं ( SBI ) प्रोबेशनरी आॅफिसरच्या दोन हजार पदांवर अर्ज मागवलेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार अर्ज करू शकतो. त्यासाठी राहिलेत फक्त 7 दिवस. ही अर्ज प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू होईल.

या वेबसाइट्सवर करा अर्ज

https://bank.sbi/careers

https://www.sbi.co.in/careers

SBI PO Recruitment 2019: महत्त्वाच्या तारखा

1. आॅनलाइन अर्ज कधीपासून कधीपर्यंत - 2 एप्रिल 2019 पासून 22 एप्रिल 2019 पर्यंत

2. अर्जाचे पैसे आणि इंटिमेशन चार्ज भरण्याची तारीख - 2 एप्रिल ते 22 एप्रिल 2019 पर्यंत

3. एन्टरन्ससाठी अॅडमिट कार्ड कधी? - जुलै 2019च्या दुसऱ्या आठवड्यात

4. एन्टरन्स परीक्षा कधी ? - 8, 9, 15 आणि 16 जून 2019

5. एन्टरन्सचा निकाल - जुलै 2019च्या पहिल्या आठवड्यात

6. मुख्य परीक्षेसाठी काॅल लेटर - जुलै 2019च्या दुसऱ्या आठवड्यात

7. मुख्य परीक्षा - 20 जुलै 2019

8. मुख्य परीक्षेचा निकाल - आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात

9. इंटरव्ह्यूसाठी काॅल लेटर कधी डाऊनलोड करायचे? - सप्टेंबर 2019

10. अंतिम मेरिट लिस्ट कधी? - आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात

पदांची संख्या

SC - 300

ST- 150

OBC- 540

EWS^- 200

GEN - 810

पदांची एकूण संख्या - 2000

LD - 20

VI - 20

HI - 73 (बॅकलाॅग  -53 सामील)

d & e- 20

अर्ज शुल्क

1. SC/ ST/ PWD: 125/- (इंटिमेशन चार्ज)

2. सामान्‍य वर्ग/ EWS/ OBC: 750/- (अर्ज शुल्‍क आणि इंटिमेशन चार्ज)

याचा रिफंड मिळणार नाही

शैक्षणिक योग्यता ( 31 आॅगस्ट 2019 )

कुठल्याही विद्यापीठाची पदवी किंवा तत्सम. उमेदवार पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला असेल तरी अर्ज करता येईल.

वयाची अट ( 1 एप्रिल 2019 )

कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष. उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1989च्या आधी नको.

यांना मिळेल वयात सूट

1. SC/ST: 5 वर्ष

2. OBC (नॉन-क्रीमी लेयर): 3 वर्ष

3. PWD-PWD (SC/ ST): 15 वर्ष

— PWD (OBC): 13 वर्ष

- PWD (Gen/ EWS): 10 वर्ष

4. पूर्ण सैनिक: 5 वर्ष

5. उमेदवार 1 जानेवारी 1980 ते  31डिसेंबर 1989 मध्ये जम्मू-काश्मीरचा रहिवासी: 5 वर्ष

अंतिम निवड

उमेदवारानं हे लक्षात ठेवावं की एन्टरन्स परीक्षेचा निर्णय यात धरला जाणार नाही. अंतिम मेरिट लिस्ट मुख्य परीक्षा आणि GE, इंटरव्ह्यू या आधारे होईल. उमेदवाराला फेज 2 आणि फेज 3 दोन्ही वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतील.

किती पगार?

ज्युनियर मॅनेजमेंट ग्रँड स्केल 1 उमेदवाराला सुरुवातीला 27,620 रुपये पगार मिळेल. सोबत 4 अॅडव्हान्स इन्क्रिमेंट मिळतील.

परीक्षांची प्रक्रिया

एन्टरन्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि ग्रुप एक्झरसाइज आणि इंटरव्ह्यू. एन्टरन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला मुख्य परीक्षा द्यायची संधी मिळेल. मुख्य परीक्षेत शाॅर्टलिस्ट झाल्यानंतर ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू देता येईल.

1. फेज-I: प्रारंभिक परीक्षा

2. फेज-II: मुख्‍य परीक्षा

3. फेज-III: ग्रुप एक्‍सरसाइज (20 गुण) आणि इंटरव्ह्यू (30 गुण)

VIDEO: प्रवाशांनो सावधान! 'जेट' आलं जमिनीवर

First published: April 15, 2019, 4:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या