झारखंड, 03 जुलै : एका माथेफिरू तरुणाने एका शिक्षिकेची निर्घृण हत्या करून शीर घेऊन फिरत असल्याची खळबळजनक घटना झारखंडमधील सरायकेला येथील खापड़ासाई प्राथमिक विद्यालय इथं घडलीये. धक्कादायक म्हणजे तब्बल एक तास हा भयंकर प्रकार सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सहायक शिक्षिका सुकरा हेस्सा शाळेत एकट्या होत्या आणि त्यांच्यासोबत काही विद्यार्थी होते. जेवनाच्या सुट्टीत रवी हेम्ब्रम नावाचा माथेफिरू शाळेत दाखल झाला. या तरुणाने शिक्षिकेवर हल्ला करून आपल्या घरापर्यंत ओढत नेलं आणि गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर हा माथेफिरू तरुणाने हातात शीर घेऊन परिसरात फिरत होता. जेव्हा तो एका मंदिरासमोर उभा होता तेव्हा पोलिसांनी या त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तिथून त्याने पळ काढला. या माथेफिरूकडे दोन तीक्ष्ण हत्यारं होती.
त्यानंतर पोलीस आणि माथेफिरूमध्ये पाठलाग सुरू झाला. थोड्या वेळाच्या पाठलागानंतर या माथेफिरूने शीर रस्त्यावर फेकून हेंसल गावाकडे निघाला. जवळपास एक तासानंतर पोलिसांनी या माथेफिरूच्या मुसक्या आवळल्या.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शाळेतील शिक्षकांनी आणि स्थानिक लोकांनी रास्ता रोको करून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. या प्रकरणाच्या निषेधार्थ शाळा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, आरोपी रवी हेम्ब्रम हा मानसिक रुग्ण होता. त्याने याआधीही काही लोकांवर हल्ले केले होते.
चार वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार,पाॅर्न व्हिडिओ पाहून केलं कृत्य