News18 Lokmat

काँग्रेस प्रवेशाबाबत सपना चौधरीने केला हा खुलासा

'भविष्यात काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार नाही. किंवा इतर पक्षात जाण्याबाबतही ठरवलेलं नाही.'

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 03:47 PM IST

काँग्रेस प्रवेशाबाबत सपना चौधरीने केला हा खुलासा

नवी दिल्ली 24 मार्च : काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातमीचा सपना चौधरी यांनी इन्कार केलाय. माध्यमात आलेला फोटो जुना असल्याचंही चौधरी यांनी सांगितलं. भविष्यात काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार नाही असंही त्या म्हणाल्या.

मनोज तिवारी यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताबाबत त्या म्हणाल्या हो मी संपर्कात आहे. पण त्याचा अर्थ मी कुठल्या पक्षात प्रवेश करतो असा नाही असंही त्यांनी सांगितलं.

भाजप आमदाराचं बेताल वक्तव्य

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं वृत्त होतं. दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचं सदस्यत्व स्वीकारल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. आता भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी सपना चौधरीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. राहुल गांधी यांनी सपनाला अपना करावं आणि राजकाणाची नवी सुरुवात करावी असं बेताल वक्तव्य सिंग यांनी केलंय.

सिंग हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर अशी अनेक मुक्ताफळंही त्यांनी उधळली. सोनिया गांधी या इटलीत आधी सपनासारखच काम करायच्या. राजीव गांधी यांनी त्यांच्याशी लग्न केलं. त्यामुळे आता राहुल गांधी यांनीही सपनाची लग्न करावं असंही त्यांनी सूचीत केलं.

Loading...

नृत्यांगणांमुळे हा देश विकास करणार नाही तर मोदींसारख्या नेत्यांमुळेच देश प्रगतीपथावर जाणार आहे असंही ते म्हणाले. सपना चौधरी या मथुरेमधून लोकसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे. 'हरियाणा की शान' सपना चौधरीच्या डान्सचा जलवा सुरू झाल्यावर पब्लिक बेफाम होत असते. सपना चौधरीची लोकप्रियता देशभरात पसरली आहे. यू ट्यूबवर सपना यांच्या गाण्यांना लाखांच्या हिट्स आहेत. बिग बॉसमध्येही सपना सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा आता काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...