जगातील सर्वात कमी वयाची पंतप्रधान, 34 व्या वर्षी करणार देशाचं नेतृत्व!

जगातील सर्वात कमी वयाची पंतप्रधान, 34 व्या वर्षी करणार देशाचं नेतृत्व!

पंतप्रधानपदासाठी 34 वर्षीय सना मरीन यांची निवड केली आहे. यासह त्या फक्त देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत.

  • Share this:

हेलसिंकी, 09 डिसेंबर : फिनलँच्या सोशल डेमोक्रेट पार्टीने रविवारी पंतप्रधानपदासाठी 34 वर्षीय सना मरीन यांची निवड केली आहे. यासह त्या फक्त देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. मरीन यांनी रविवारी झालेल्या मतदानात विजय मिळवला. त्यांनी अँटि रिने यांची जागा घेतली आहे. त्यांना पोस्टाचा संप मोडून काढण्यावरून आघाडीतील सहकारी पक्षाने काढून घेतल्याने मंगळवारी राजीनामा द्यावा लागला होता.

मरीन यांनी सांगितले की, आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला असल्याने खूप काम करावं लागेल. मी माझ्या वयाबद्दल किंवा महिला असल्याचा विचार केला नाही. काही कारणांनी मी राजकारणात आले आणि त्यासाठी मतदारांनी विश्वासही टाकला.

फिनलँडच्या राजकारणात 27 व्या वर्षी मरीन यांनी प्रवेश केला होता. 2014 मध्ये पक्षाची उपाध्यक्षही झाली. त्यानंतर 2019 मध्ये देशातील ट्रान्सपोर्ट आणि कम्यूनिकेशन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. अँटि रिनेच्या मंत्रिमंडळात त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मरीन पंतप्रधान झाल्या आहेत.

सर्वात कमी वयात पंतप्रधानपद सांभाळण्याचा मानही मरीन यांनी पटकावला आहे. न्यूझीलंडमध्ये जेकिंडा आर्डेन 39 व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. युक्रेनमध्ये ओलेक्सी होन्चारुक 35 व्या वर्षी तर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनीही 35 व्या वर्षी देशाचं नेतृत्व स्वीकारलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: finland
First Published: Dec 10, 2019 07:28 AM IST

ताज्या बातम्या